फोटो : NSK26H33448
नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भेटीप्रसंगी उपस्थित राजे शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी. शेजारी मुख्याध्यापक रवींद्र पाटील, सुमित्रा तोरवणे, सुनील पाटील, महेंद्र सोनी, निलेश पाटील, मुकेश पाटील आदी.
-----------------
विद्यार्थ्यांनी अनुभवले शासकीय कामकाज
राजे शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २५ : श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित राजे शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मार्गदर्शक सहल नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार जिल्हा ग्रंथालयात काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी शासकीय कामकाजाची रचना व पद्धत समजून घेतली.
सहलीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांनी भेट दिली. या कार्यालयाअंतर्गत येणारे नगररचना, महसूल, लेखापरीक्षण, निवडणूक शाखा, गृह शाखा, भूसंपादन शाखा, अन्न व नागरी पुरवठा विभाग, रोजगार हमी योजना, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा नियोजन समिती आदी विभागाची प्रशासकीय रचना समजून घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलिस कार्यालयातील शस्त्र आगाराला विद्यार्थ्यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक किशन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र साळुंखे, रामचंद्र मोहने, सचिन सावंत, कवायत शिक्षक रवींद्र पवार, विजय पाटील व गणेश पाटील यांनी विविध प्रकारच्या शस्त्रांची माहिती दिली. बॉम्ब शोध पथकातील श्री. राऊत, श्री. वसईकर यांनी मेटल डिटेक्टरची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून दिली.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वसावे यांनी ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहल पार पडली. शिक्षिका सुमित्रा तोरवणे, सुनील पाटील, महेंद्र सोनी, निलेश पाटील, मुकेश पाटील यांनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.