nashik magnet man esakal
नाशिक

Nashik Magnet Man : राजेश टोपेंनी दिले चौकशीचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिकच्या सिडको भागात राहणारे अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष करून सोनार यांनी कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यावर हा प्रकार त्यांच्याबाबतीत घडत असल्याचे त्यांनी सांगितले. या याप्रकाराबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत प्रशासनापुढे नवीन आव्हान उभे राहिले असून हा संशोधनाचा विषय समोर येत आहे.

लस घेतल्यानंतर धातूच्या वस्तू थेट शरीरावर चिटकल्या

अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुूरू झाली. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर सकाळने याचा पाठपुरावा केला. यावेळी कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. असे सोनार यांनी सांगितले. यावेळी सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून सुध्दा दाखवल्या.

या प्रकाराची चौकशी होईल - राजेश टोपे

वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, यामागे नक्की काय आहे, ते तपासले जाईल. मेडिकल कारण काय आहे, हे तपासू या. त्यानंतर नक्की कशामुळे हे झाले आहे, ते पाहू.

डॉक्टर म्हणतात..

"त्यांनी ज्या खासगी रुग्णालयात लस घेतली आहे, त्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. मात्र असा प्रकार घडल्याचा यापूर्वी कुठलाही विषय आलेला नाही" -उमेश मराठे, लाईफ केअर हॉस्पीटल, संचालक

हा नक्की काय प्रकार आहे?

"मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे" - अरविंद सोनार, ज्येष्ठ नागरिक, सिडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: दुपदरीवरून एकपदरी... MMRDAचा वादग्रस्त पूल अखेर खुला, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार

Karanje Industrial Estate : नव्या उद्योजकांना मोठी संधी! करंजेतील 'या' 58 भूखंडांचा होणार पुन्हा ऑनलाइन लिलाव; सातारा पालिका 29 भूखंड घेणार ताब्यात

Latest Marathi News Live Update : ठाकरेंचे ६ बंडखोर खासदार मुंबईत दाखल

Fifa World Cup 2026: ९२ वर्षानंतर पहिला विजय... इजिप्तसाठी मोहम्मद सलाह हिरो ठरला; संघासाठी वर्ल्ड कपमध्ये नोंदवले सर्वाधिक गोल

Monsoon Active Again: मॉन्सून पुन्हा सक्रिय! रायगड, पुण्यापर्यंत पोहोचला, ४८ तासात मुंबईत दाखल होणार

SCROLL FOR NEXT