नाशिक

‘प्रहार’ चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव, वामिका गब्बी जळगावात

CD
राजकुमार राव, वामिका गब्बी ‘प्रहार’ चित्रपटानिमित्त जळगावात उज्ज्वल निकम यांचीही उपस्थिती; रविवारी दुचाकी रॅली सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ चित्रपटानिमित्त अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम रविवारी (ता. ११) जळगावात येणार आहेत. या वेळी चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधण्याची संधी जळगावकर रसिकांना मिळणार आहे. ‘प्रहार’ चित्रपटातून उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलू, त्यांचे कार्य आणि न्यायव्यवस्थेतील योगदान उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटाविषयी चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता असून, प्रमुख कलाकारांच्या जळगाव भेटीमुळे रसिकांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती संभाजी नाट्यगृहापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत. समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ. रेखा महाजन, डॉ. राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, ॲड. भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतीक्षा सोनवणे, विराज कावडिया आणि हर्षल पाटील यांचा समावेश आहे. जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Peace Prize 2026 : शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतीय वंशाच्या नवी पिल्लई आहेत तरी कोण? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास...

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Maharashtra Live News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नवी मुंबईत भावुक क्षण; रांगोळीतून दिली अनोखी श्रद्धांजली

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT