नाशिक

राजमालती नगरातील समस्यांचा पाढा; आठ महिन्यांपासून निवेदनाकडे दुर्लक्ष

CD
मेन फिचर टुडे २ लोगो : नव्या वस्त्या, जुन्याच समस्या (हा लोगो २ ऑक्टोबरच्या शहर टुडे पान २ वरून घ्यावा) -- NSK26H31246 जळगाव : राजमालती नगरात रस्त्याच्या मधोमध उभारलेली डीपी. ------------- NSK26H31247 पक्की गटार नसल्याने तुंबलेले सांडपाणी. ------------ NSK26H31248 गल्लीतील खराब रस्ते. ---- राजमालती नगरातील समस्या ‘जैसे थे’; तक्रारींकडे दुर्लक्ष कुठे घंटागाडीचा पत्ता नाही, कुठे तुंबलेल्या गटारी; अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३ : शहराच्या विस्तारित भागातील राजमालती नगर परिसरात मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप कायम आहे. परिसरातील काही भागांत नियमित घंटागाडी येत नसल्याने कचरा संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या असून, त्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुख्य रस्त्यांवर डांबरीकरण झाले असले, तरी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती अद्याप अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापौरांना निवेदन देऊन आठ महिने उलटले, तरी अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. राजमालती नगरातील नवीन विस्तारित भागात नागरी सुविधांची स्थिती काही ठिकाणी चांगली, तर काही भागांत अत्यंत विस्कळीत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी घंटागाडी नियमित येत असल्याने कचरा संकलन सुरळीत आहे. मात्र, परिसरातील सर्वच भागांमध्ये ही सुविधा समान पद्धतीने उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. घंटागाडी न येणाऱ्या ठिकाणी नागरिकांना कचरा साठवून ठेवावा लागत असून, त्याचा परिणाम परिसराच्या स्वच्छतेवर होत आहे. गटारींच्या स्वच्छतेचा प्रश्न परिसरातील अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याची समस्या नागरिकांनी मांडली आहे. पावसाचे पाणी तसेच सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने गटारींची नियमित साफसफाई करण्याची मागणी आहे. काही ठिकाणी गटारी स्वच्छ असल्याचे चित्र दिसत असले, तरी संपूर्ण परिसरासाठी नियमित स्वच्छता व्यवस्था आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंतर्गत रस्त्यांची प्रतीक्षा राजमालती नगरातील मुख्य रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमुख मार्गांवरील वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अंतर्गत रस्त्यांची स्थिती अद्याप सुधारण्याची गरज आहे. खड्डे, खराब पृष्ठभाग आणि अपुऱ्या दुरुस्तीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांप्रमाणे अंतर्गत रस्त्यांकडेही महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. रस्त्यांच्या मधोमध डीपी परिसरातील रस्त्यांच्या मधोमध असलेल्या डीपींचाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वाहतुकीच्या मार्गात डीपी असल्याने वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात. रात्रीच्या वेळी या डीपींमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने पाहणी करून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी आहे. चौकट आठ महिन्यांपासून निवेदनाकडे दुर्लक्ष राजमालती नगरातील विविध समस्यांबाबत नागरिकांनी महापौरांना निवेदन दिले होते. या निवेदनाला तब्बल आठ महिने उलटले असूनही अनेक प्रश्न अद्याप कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे निवेदन देऊनही समस्या सुटत नसतील, तर नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची, असा सवाल उपस्थित होत आहे. विस्तारित भागांत नियमित कचरा संकलन, गटारींची स्वच्छता, रस्ते दुरुस्ती आणि सुरक्षित वीज व्यवस्था या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे राजमालती नगरातील समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोट समस्यांबाबत आठ महिन्यांपूर्वी निवेदन दिले, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. काही भागांत घंटागाडी येत नाही, गटारी तुंबल्या आहेत, तर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. महापालिकेने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामे करून नागरिकांना दिलासा द्यावा. - कमलाकर अहिरे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT