A scene from the drama esakal
नाशिक

Rajya Natya Spardha: ‘युद्धविराम’मधून ट्रॉयच्या महाराणीची अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ट्रोजन अन् ग्रीक नागरिकांच्या शौर्याने सुमारे १० वर्ष चाललेल्या युद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून ट्रॉयच्या महाराणीची अस्वस्थता मांडणारी नाट्यकृती म्हणजे ‘युद्धविराम’.

६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मंगळवारी (ता. २१) बाबाज् थिएटर नाशिकतर्फे सादर करण्यात आले. (Rajya Natya Spardha Queen of Troy dismay from truce nashik)

अक्षय संत यांनी नाटकाचे लेखन केले असून आरती प्रभू हिरे यांनी दिग्दर्शन केले आहे. ट्रॉयचे युद्ध अन् त्यानंतर तेथे उद्भवलेली परिस्थिती याचे यथार्थ चित्रण या नाट्यकृतीतून प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाले.

१० वर्ष ट्रोजन विरुद्ध ग्रीक युद्ध चालले. कपट, कारस्थान करून ग्रीक लढाई जिंकले. ट्रॉयची महाराणी हक्युबा पराभवानंतर गुलाम म्हणून जाताना सुद्धा ताठ मानेने गेली. त्यामुळे विजय मिळवूनही त्याचा आनंद ग्रीकांना साजरा करता येत नव्हता.

त्यामुळे ग्रीकांनी अतोनात अत्याचार करण्यास सुरवात केली. या सर्वांना सामोरे जाताना महाराणीची एक स्त्री, आई, आजी व सम्राज्ञीची अन् राज्यातील स्त्रियांची युद्धानंतरची अस्वस्थ करणारी अवस्था प्रेक्षकांनी अनुभवली.

नाट्यकृतीतील काही प्रसंगातून अधिक प्रभावी दिग्दर्शनाची आवश्यकता असल्याचे जाणवले. तरी कलावंतांनी भूमिकेतून अभिनयावर आपली पकड कायम ठेवली. प्रत्येक दृष्याना समर्पक संगीत देण्याचा प्रयत्न रोहित सरोदे यांनी केला.

तो बऱ्याच अंशी प्रभावशाली वाटला. रवी रहाणे यांची प्रकाशयोजना उत्तम होती. माणिक कानडे यांची रंगभूषा तर कला, द डिझायनर यांनी केलेली वेशभूषा समर्पक होती. वरुण भोईर यांचे नेपथ्य युद्ध परिस्थिती दर्शविणारे दिसून आले. काही दृश्यातून संथपणे नाटकाचा प्रवाह जाताना युद्धासारख्या रोमांचकारी प्रसंगांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

लक्ष्मी गाडेकर पिंपळे, कविता आहेर, गीतांजली घोरपडे, आर्या प्रशांत, अनुजा ओढेकर, पायल साळवे, रूपाली भोळे, रसिका दाणी, खुशी पवार, महिता आहेर, मानसी धूर्वे, प्रशांत साठे, अभय सूर्यवंशी, श्रीकांत वाखारकर, निषाद वाघ, नंदकुमार देशपांडे, अतुल धुर्वे या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT