Drama esakal
नाशिक

Rajya Natya Spardha: राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा! 20 नोव्हेंबरपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रंगकर्मींच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ६२ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा २० नोव्हेंबरला वाजणार असून १३ डिसेंबर पर्यंत हा नाट्यसंग्राम रंगणार आहे.

शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. (Rajya Natya Spardha Starting from 20 November nashik)

रंगभूमीची निःस्वार्थ सेवा करणारा प्रत्येक रंगकर्मी दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेची आतुरतेने वाट पाहात असतो. राज्य नाट्यस्पर्धा रंगकर्मी अन् नाट्यरसिकांसाठी नाट्यकुंभाची पर्वणीच असते.

यंदा नाशिक केंद्रावर विविध संस्थांच्या माध्यमातून २२ नाट्यकृतींचे सादरीकरण होणार असल्याने रसिकांसाठी नाटकांची भरगच्च मेजवानी असणार आहे. 'संगीत अवघडीचे दिवस' या नाटकाने स्पर्धेला सुरवात होणार आहे तर 'ही कशानं धुंदी आली' नाटकाने स्पर्धेचा समारोप होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली आहे.

नाशिक केंद्रावर नाट्यकर्मींना सादरीकरणात कुठल्याही असुविधा व्हायला नको याची दक्षता घेऊन पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती केंद्र समन्वयक राजेश जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांच्या निधनाबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

RBI Repo Rate: महागाई झाली कमी! आता तुमचा EMI कमी होणार का? RBI लवकरच घेणार मोठा निर्णय

Crime News: कसारा रेल्वेस्थानकात टीसीकडून ७ वर्षांच्या चिमकुलीचा आईसमोरच विनयभंग; महिलेने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले अन्...

Panchang 15 July 2025: आजच्या दिवशी ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

Solapur News : गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा खा. मोहिते पाटलांकडून निषेध

SCROLL FOR NEXT