Actors of HAEWRC Rangshakha Ozar performing scenes from the play 'Koos Badaltana' in the state drama competition. esakal
नाशिक

Rajya Natya Spardha: नात्यातील सुखदुखाचा संघर्ष ‘कूस बदलताना’

प्रतीक जोशी

नाशिक : स्री-पुरुषाच्या नात्यातील सुखदुखाचा गुंता सोडविताना होणाऱ्या संघर्षाची कहाणी सांगणारी नाट्यकृती म्हणजे ‘कूस बदलताना’.

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (ता. २४) एचएईडब्ल्यूआरसी रंगशाखा, ओझर या संस्थेतर्फे सादर करण्यात आली. भगवान हिरे लिखित या नाटकाचे चारुदत्त हिरे यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha Struggle of Happiness in Relationship kus badaltana nashik)

आधुनिक काळात माणसाचे विचार, राहणीमान यांसह जगण्याची पद्धत देखील बदलत चालली आहे. ऐहिक सुखासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब केला जातोय. ‘लीव्ह इन रिलेशनशिप’ हा त्याचाच एक भाग.

मात्र लग्नाविना स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणं जरी स्वातंत्र्याच वाटत असलं तरी रुढींचा पीळ त्याभोवती असतोच. हे स्वातंत्र्य असलेलं नात जितकं दीर्घ काळ पुढे जातं तसतसा तो पीळ देखील घट्ट होत जातो.

त्यामुळे नात्यातील गुंता कायम राहतो. नात्यातील हाच गुंता सोडविण्याचा व नवा विचार घेऊन नवी सुरवात करणारे कथानक ‘कूस बदलताना’ नाटकातून प्रेक्षकांनी अनुभवले.

रितेश गायकवाड, भारत मधाळे, रंजना चौधरी, शंकर वाघमारे, सुमन शर्मा या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. नाटकाचे संगीत विकास शिंदे, तेजस बिल्दीकर तर प्रकाशयोजना संदेश सावंत, कृतार्थ कंसारा यांनी केली.

माणिक कानडे, अनुप खैरनार यांनी पात्रांच्या रंगभूषा तर लीना सोनार, राखी लढ्ढा यांनी वेशभूषा साकारल्या. नेपथ्य विजय घोरण, दीनानाथ प्रजापती यांनी साकारले.

पराग अमृतकर, रवींद्र शिंदे, मिलिंद मेधने, प्रवीण मोकाशी, दीपक ढोली, अशोक सोनवणे, तुषार जाधव, महेश बोरसे, प्रशांत हजारे यांनी रंगमंच सहाय्य केले.

मागे जा...

नाटकाच्या सादरीकरणादरम्यान नाटकाचे व्हिडिओ रेकॉर्डिगसाठी एकजण अगदी उत्साहात मंचासमोर येऊन उभा ठाकला. त्यामुळे प्रेक्षकांना अडथळा तर होतच होता मात्र परीक्षकांना त्याच्यामुळे रंगमंचावरी नाट्य पाहण्यास अवघड जात होते. त्यामुळे खुद्द परीक्षकांना त्याला मागे जाण्याची सूचना करावी लागली.

आजचे नाटक

विदूषक

लेखक- प्रभाकर दुपारे, दिग्दर्शक - मार्टिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT