Rakshabandhan 2022 latest marathi news esakal
नाशिक

Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना पूजेच्या ताटात आवर्जून असाव्या या गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan Festival :

भावाला औक्षण करताना ताटात या गोष्टी जरुर ठेवा, प्रत्येकाला आहे विशेष महत्व

बहिण भावाच्या गोड नात्याला अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यादिवशी बहिण भावाला राखी बांधते तेव्हा भाऊ आजीवन तिच्या रक्षणाच वचन बहिणीला देतो. याचप्रकारे बहिण भावाला राखी बांधते तेव्हा तीसुद्धा भावाला औक्षण करते.

बहिण जेव्हा भावाल राखी बांधते त्यावेळी औक्षण केले जाते. औक्षण करताना औक्षणाच्या ताटात असलेल्या प्रत्येक गोष्टीला एक विशेष महत्व आहे. त्यामुळे औक्षणाच्या ताटात या गोष्टी आवर्जून असायलाच हव्यात, सोबतच काय महत्व आहे या प्रत्येक गोष्टीचे तेही आपण जाणून घेवूया. (Latest Marathi News)

कुंकू :

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भावाला ओवाळण्यासाठी औक्षणाच्या ताटात कुंकू हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून केली जाते. त्यामुळे ताटातील कुंकवानं भावाच्या माथी टिळा लावणं हे दिर्घायु सोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.

हळद :

हळद ही आरोग्यदायक असते, याचसोबत हळद आणि कुंकू हे सौख्य- समृध्दीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पुजेच्या ताटात कुंकूवासोबत हळद अवश्य ठेवावी.

अक्षता :

अक्षता औक्षवंत म्हणजे आयुष्याची वाढ करणारी असते असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पुजेच्या ताटात असाव्या. त्यामुळे रक्षाबंधानानिमित्त केलेलं पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे हा त्यामागील अर्थ आहे.

नाण- सोनं- सुपारी ः भावाच्या कपाळी कुंकूवाचा टिळा लावल्यानंतर नाण- सोनं- सुपारी ने औक्षण करावे. धन-धान्य समृध्दीचे प्रतीक अन् इडा-पिडा टळावी म्हणून या तिन्ही गोष्टींनी ओवाळावे. यासाठी ताटात रुपयाचे नाणे, सोन्याचा एखादा अलंकार (उदा.- अंगठी) आणि सुपारी ठेवावी.

नारळ :

नारळाला श्रीफळ म्हटले जाते. भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहिण या दिवशी करते यामुळे औक्षणाच्या ताटात श्रीफळ (नारळ) जरुर ठेवावे.

राखी :

मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष शांत होतात असा समज आहे. मनगटांच्या नसांवर राखीच्या धाग्यानं दाब पडल्यानं हे तिन्ही दोष नियंत्रित राहतात असं म्हटलं जातं. त्यामुळे राखी शोभेची घ्यावी मात्र ती प्लास्टीक वैगरेच्या दोऱ्यांपेक्षा सुती किंवी रेशमी दोऱ्याची असावी.

दिवा :

वाईट शक्तींपासून भावाचे रक्षण व्हावे आणि आपला भाऊ औक्षवंत व्हावा यासाठी बहिण भावाला राखी बांधल्यानंतर ओवाळते. त्यासाठी ओवाळणीच्या ताटात दिवा असणं महत्त्वाचं आहे. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानण्यात आलं आहे.

मिठाई :

कुठल्याही आनंदाच्या वेळी तोंड गोड केलेच पाहिजे. आणि हा तर भावा- बहिणीच्या गोड नात्याची गाठ अधिक घट्ट करणारा सण. त्यामुळे यादिवशी औक्षण करताना भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणं आवश्यक आहे. बहिण-भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गोडवा कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला महत्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT