Preserved idols of Shri Ram Raya in the temple of Mahesh Nakil in Gangapur-Jalalpur Shivara.
Preserved idols of Shri Ram Raya in the temple of Mahesh Nakil in Gangapur-Jalalpur Shivara. esakal
नाशिक

Ram Navami 2023 : साडेचारशे वर्षांच्या श्रीरामांच्या मूर्तींचे संवर्धन!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर- जलालपूर शिवारातील महेश नाकील यांच्या मंदिरातील श्रीराम रायांच्या मनमोहक मूर्तींचे जतन-संवर्धन यशस्वी झाले. पूर्ण लाकडी आणि भाजलेल्या विटांमधील बांधकाम असलेले हे मंदिर आहे.

गाभाऱ्यातील सुंदर लाकडी मूर्ती सुबक आहेत. लाकडी कोरीव मखरीमधील मूर्ती पाहताना दंडकारण्याची अनुभूती आल्याखेरीज राहत नाही. मध्यंतरी काही काळ हे मंदिर दुर्लक्षित अवस्थेत होते. मूर्तींचे अंदाजित आयुर्मान साडेचारशे वर्षांच्या आसपास आहे. (Ram Navami 2023 Conservation of 450 years of Shri Ram Idols nashik news)

जतन-संवर्धनाच्या पूर्ण प्रक्रियेत नैसर्गिक पदार्थांचा वापर केला. मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत पक्केपणा देण्यात आला. मूर्ती जतन- संवर्धनाचे काम ४५ दिवस चालले होते. स्मरतुगामी रामराया असा मंदिराचा लौकिक आहे.

गोदावरीच्या काठावरील मोहक आणि लोभस रुप लाभलेल्या चारही मूर्ती नयन रम्य आहेत. श्रीराम रायांसह कुटुंब वनवासात मार्गक्रमण करत आहेत, या आविर्भावातील हे मंदिर आहे. या सर्व मूर्तींचे सौंदर्यीकरण करून त्यावरील दागदागिने सजविण्यासाठी शुध्द सोन्याचा वर्ख वापरण्यात आला आहे.

वनवासातील मार्गक्रमण करताना कमी दागिने, श्रृंगार आणि कपड्यांची रचना, त्याचा पोत असे सर्व बारकावे मूर्तींमध्ये प्रभावीपणे शिल्पांकीत केले आहेत. श्रीराम मंदिराचे अध्यक्ष महेश नाकील म्हणाले, की श्री राम मंदिराचा उल्लेख पेशवेकालीन दस्ताऐवजांमध्ये श्री. रास्ते यांच्याशी संबंधित असल्याचा उल्लेख आढळतो.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तसेच पूर्ण गोवर्धन, आनंदवली शिवारामधील हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीराम रायांच्या सहकुटुंब प्राचीन मूर्ती काही काळासाठी दुर्लक्षित होत्या. मात्र आता मूळ मूर्तीचा व परिसराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. भविष्यात या अमूल्य ठेव्याचे संवर्धन व देखभाल करण्याचा कायम प्रयत्न करण्याचा निश्चय आहे.

"मूर्तींचे ‘रूट कंजर्व्हेशन’ करण्यात आले. ही पूर्णपणे सुरक्षित व ‘रिव्हर्सेबल’ पद्धती आहे. या पद्धतीने मूर्तीच्या गाभ्यापर्यंत पक्केपणा आणला जातो, जेणेकरून मूर्तीच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता व कोणत्याही प्रकारची पृष्ठभागाची हानी न करता ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संवर्धनात नैसर्गिक राळ, मोती भस्म, उच्चप्रतीची लाख, हिरक भस्म, मूर्तीशास्त्रानुसार तेथील वातावरणातील ‘फंगस' आणि ‘बॅक्टरिअल ग्रोथ' थांबवण्यासाठी ही नैसर्गिक उपाययोजना करण्यात आली."- मयूर शांताराम मोरे, अध्यक्ष, मिट्टी फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT