Hemant Deshpande performing Aarti after Mahapuja on the occasion of Ram Navami today at Kodanddhari Ram Mandir in Bhosla Campus of Central Hindu Military Education Society. esakal
नाशिक

Ram Navami 2023 : ‘सीयावर रामचंद्र की जय’ च्या घोषात कोदंडधारी राममंदिरात महापूजा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला कॅम्पसमधील कोदंडधारी राममंदिरात गुरुवारी (ता.३०) रामनवमीनिमित्त भक्तीमय वातावरणात महापूजा करण्यात आली. एनसीसी छात्र, रामदंडीसह रायफल व अश्वपथकांने मानवंदना दिली.

दिवसभर भगव्या ध्वजासह ढोलपथकाचा निनाद, रामरक्षा, गीतेतील पंधराव्या अध्ययनाचे पठण आणि शंखनाद, दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून ‘सीयावर रामचंद्र की जय, जय श्रीराम' च्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. (Ram Navami 2023 Mahapuja at Kodanddhari Ram Mandir with slogan of Siyavar Ramchandra Ki Jai nashik news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांच्या हस्ते कुटुंबासह महापूजा करण्यात आली. संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगांवकर, नाशिक विभागाचे सहकार्यवाह नितीन गर्गे, खजिनदार शीतल देशपांडे, प्रशांत नाईक, राममंदिराचे अध्यक्ष नरेंद्र वाणी, सुयोग शहा आदी उपस्थित होते.

श्रीराम जन्मोत्सवानंतर राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या वेशभूषेतील बालकांना मानवंदना देण्यात आली. भगव्या वेशातील युवक- युवतींकडून शंखनाद करण्यात आला. तत्पूर्वी रामरक्षा पठणाबरोबरच गीतेतील पंधराव्या अध्यायाचे पठण करण्यात आले. आरतीनंतर सर्वांना प्रसादाचे वाटप केले.

महाकाय रांगोळीतून ‘रामचरित्र अन् देशभक्ती`ची झलक पाहावयास मिळत आहे. ९०० किलो रांगोळीचा वापर,१०८ रामनामवली, संपूर्ण वंदेमातरम् अशी रचना करण्यात आली आहे. रामनवमीचे औचित्य साधत रेखाटलेली ही रांगोळी पाहण्यासाठी आज गर्दी झाली होती. शुक्रवारी (ता.३१) सायंकाळपर्यत ही रांगोळी नाशिककरांना पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Video: काच तोडली अन् प्रवाशांची सुटका! पण उंचावरून चालणारी मोनोरेल बंद कशी पडली? कारण समोर, पाहा सुटकेचा थरारक व्हिडिओ

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर! भिंत कोसळल्याची घटना, रहिवाशांचे स्थलांतर

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Kidney Failure Causes: किडनी फेल होण्याचं कारण बनतो UTI? 'ही' 5 लक्षणं वेळीच ओळखा आणि उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT