ramdan eid  esakal
नाशिक

Ramdan Eid 2023 : रमजान पर्वाच्या पहिल्या खंडाची समाप्ती; मुस्लिम बांधवांकडून ईदच्या तयारीला वेग

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : रमजान पर्व तीन खंडात साजरा होतो. त्यातील पहिल्या खंडाची रविवारी (ता. २) दहाव्या रोजा (उपवास) ने समाप्ती झाली. सोमवारी (ता.३) पासून दुसऱ्या खंडास प्रारंभ होणार आहे. मुस्लिम बांधवांकडून ईदच्या तयारीस वेग आला आहे. (Ramadan 2023 Preparation for Eid has been speeded up by Muslim brothers nashik news)


रमजान पर्व रहेमत, मगफिरत, जाहन्नूमसे आजादी अशा तीन खंडात विभागला आहे. प्रत्येकी १० उपवासाचा एक खंड असतो. रविवारी (ता.२) यंदाच्या पर्वातील १० उपवास पूर्ण झाल्याने पहिल्या रहेमतच्या खंडाचा समारोप झाला. रहेमत (कृपाखंड) च्या दहा दिवसांमध्ये अल्लाची विशेष कृपा होत असते.

त्यानिमित्त मुस्लिम बांधव या दिवसांमध्ये इबादत करत असताना त्यांच्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना करत असतात. तसेच व्यवसायात, नोकरीत, दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊन भरभराटी येवू दे, यासाठी प्रार्थना करत असतात. पहिल्या खंडाच्या समारोपाने मुस्लिम बांधवांकडून ईदच्या तयारी वेग आला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

घराची स्वच्छता करणे, रंगरंगोटी करणे, आकर्षक विद्युत रोषणाई करणे तसेच, अन्य विविध प्रकारची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे पर्वाच्या अन्य खंडांमध्ये आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीस बाजारपेठेत गर्दी होत आहे.

खंडाच्या समारोपाने मुस्लिम बांधवांना ईदची चाहूल लागली आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी (ता.३) पासून मगफिरत या दुसऱ्या खंडास प्रारंभ होत आहे. विविध मशिदींमध्ये सुरू असलेल्या तरावीच्या नमाजमध्ये पठण करण्यात येणारे कुराण शरीफचे बहुतांशी पारे (अध्याय) पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT