Ramadas Athawale Google
नाशिक

'नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे नाव द्यावे'

विनोद बेदरकर

नाशिक : ओझर (नाशिक) येथील मधील विमान तळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे. यासंदर्भात दिल्लीत मंत्र्यांना भेटणार असल्याची माहीती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आठवले आज नाशिकच्या दौऱ्यावर होते दुपारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, विश्वनाथ काळे आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


खासदार आठवले म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत टोलवाटोलवी सुरु आहे. काँग्रेसच्या ६० वर्षाच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाला नाही. बाकी राज्यात ही ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा,आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. जोपर्यत जातीय व्यवस्था आहे तर आरक्षण असलं पाहिजे. अशीच आमची भूमिका असून केंद्रातील मोदी सरकारच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेले नसतील तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.म्हणून काय त्यांचा आरक्षणाला विरोध आहे असं होतं नाही. मराठा समाजात ज्यांचं उत्पन्न कमी आहे.त्यांना आरक्षण दिल पाहिजे. आमचं फडणवीस सरकार असत तर आम्ही चांगली बाजू मांडली असती. मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारला बाजू मांडता आली नाही


महापालिका निवडणूका भाजपासोबत

केंद्राने राज्यातील चार मंत्र्यांना संधी दिली आहे. त्याचा राज्याला फायदा होईल. स्थानीक स्वराज्य संस्थामध्येही भाजप समर्थक पक्षाचेच सरकार आणायचे आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहे. राज्यात मुंबई नाशिकसह १० मनपा भाजप आणि आम्ही जिंकणार आम्ही भाजप सोबत राहणार आहे. कोरोनामुळे सामान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कोरोना काळात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया मधील काही पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.त्यांना ही ५० लाखाच्या विमा मिळावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. आता तिसरी लाटेची चर्चा आहे. मात्र ही लाट येणारच नाही. याची काळजी घ्यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आधीपासून काळजी घ्‍यावी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे.



आघाडी दुबली

देशात सत्ताधारी भाजप विरोधात आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बैठकीला किती लोक जातील माहीत नाही.सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे अवघड आहे.एकत्र आले तर मोदींना फायदा होईल. मोदी खमके नेते आहेत. पुढील निवडणूका आम्ही जिंकणार,पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे मत वाढले. तिथे काँग्रेसला मत नाही मिळालेली नाहीत. सध्या भाजपतर्फे जन आर्शिवाद यात्रा सुरु आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीना
लोकाचा आशीर्वाद मागण्याचा आधिकार आहे. त्यामुळे लोकांपर्यत पोहोचण्यासाठी जन आर्शिवाद यात्रा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारकडून गर्दीबाबत जो बाउ केला जातो आहे. तो चुकीचा आहे. तुम्ही आंदोलन केली तेव्हा कोरोना दिसला नाही का ? असा प्रश्न उपस्थित करीत, श्री आठवले यांनी कोरोनाचा तिसरा टप्पा येईल असं वाटत नाही. अस मत मांडल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT