नगरसूल (जि.नाशिक) : सात वर्षांपासून अंथरुणावर खिळलेल्या वृद्ध आई-वडिलांना अगदी लहान लेकरागत अंघोळ घालणे, खाऊपिऊ घालणे, औषधोपचार आदींसह सेवा करणे हा नित्यक्रम मुलगा रामदास यांचा सुरू होता. अशातच नियतीने क्रूर डाव साधला..आणि कलियुगातला श्रावणबाळ हरपला. अवघे गाव हळहळले.. (ramdas-kadam-death-who-proudly-Nursing-of-parents-nashik-marathi-news)
कलियुगातला श्रावणबाळ हरपला...
दूरसंचार निगममध्ये नोकरी करून निवृत्त झालेले रामदास कदम यांचे शुक्रवारी (ता. २३) मातुलठाण येथे मारुती मंदिरात विश्रांती घेत असतानाच हृदयविकाराने निधन झाले. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेले रामदास कदम पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह राहत असत. मात्र, वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी निवृत्तीनंतर ते गावी राहात होते. सात वर्षांपासून अंथरुणावर खिळलेल्या वृद्ध आई-वडिलांना अगदी लहान लेकरागत अंघोळ घालणे, खाऊपिऊ घालणे, औषधोपचार आदींसह सेवा करणे हा नित्यक्रम मुलगा रामदास यांचा सुरू होता. त्यातच त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे सांभाळ करणे कठीण होते. अंघोळ घालणे, केस विंचरून स्वतःच्या हाताने आईला अन्न ते भरवत असत. मात्र, गेल्या वर्षी आईचे निधन झाले. अंथरुणावर खिळलेल्या वडिलांची मुलगा रामदास यांच्याकडून सेवा सुरूच होती. मात्र, नियतीने क्रूर डाव साधला आणि आधुनिक युगातील श्रावणबाळ रामदास कदम यांचा वृद्ध वडिलांच्या अगोदरच मृत्यू झाला. हल्ली पोटच्या मुलांनी वयोवृद्ध आई-वडिलांना वाऱ्यावर सोडल्याचे किंवा वृद्धाश्रमात पाठविल्याची उदाहरणे दिसतात. मात्र, कदम यांची माता-पित्यांची सेवा ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा करणारे रामदास कदम यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. मातुलठाण (ता. येवला) येथील कलियुगातील श्रावणबाळ हरपल्याने कदम कुटुंबीयांसोबतच ग्रामस्थांना आठवणींमुळे अश्रू अनावर झाले.
‘रामदास बाळ’ योजना राबविण्याचा संकल्प
वृद्धांना आधार देण्यासाठी शासनाची श्रावणबाळ योजना आहे. त्याच धर्तीवर मातुलठाण गावात रामदास यांच्या आठवणीप्रीत्यर्थ आई-वडिलांची सेवा करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन ‘रामदास बाळ’ योजना राबविण्याचा संकल्प येथील समाजिक कार्यकर्ते हिरालाल घुगे, कदम परिवार व ग्रामस्थांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.