Nashik municipal corporation  esakal
नाशिक

नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार,अखेर शिक्कामोर्तब

अभियांत्रिकीचे पदवीधारक असलेल्या पवारांनी अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी मुंबईतील व्हीजेटीआयमधून प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र शासनाने मुंबई महापालिकेतील सह आयुक्त (सुधार) रमेश पवार यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. लवकरच ते या पदाचा पदभार स्वीकारतील. अभियांत्रिकीचे पदवीधारक असलेल्या पवारांनी अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी मुंबईतील व्हीजेटीआयमधून प्राप्त केलेली आहे. पवार यांना महापालिकेतील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त म्हणून विविध खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

अजोय मेहता आणि प्रवीण परदेशी हे महापालिकेचे आयुक्त असताना आयुक्त कार्यालयाची जबाबदारी त्यांनी ५ वर्षे चांगल्यारितीने सांभाळली आहे. शिवाय कोरोनाचा विस्फोट झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात आरोग्य विभागात त्यांनी खूप मूलभूत काम केले आहे. मुंबई महापालिकेतील विविध योजनांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. नाशिकमध्ये या योजना राबविण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहतील.

सध्या पवार मुंबई महापालिकेत सहआयुक्त (सुधार) या पदावर कार्यरत आहेत. हे महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे पद असून पूर्वी या पदावर अजोय मेहता, सीताराम कुंटे, आर. ए. राजीव, सतीश भिडे, राधा अशा नामवंत आयएएस अधिकाऱ्यांनी काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT