eid
eid eid
नाशिक

सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान सुने सुने! घरातूनच रमजान ईद साजरी

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात गुरुवारी (ता. १३) चंद्रदर्शन झाल्याने शहर व परिसरात घरोघरी रमजान ईद(Ramzan Eid) शांततेत व उत्साहात झाली. कोरोना संसर्गामुळे(corona virus) असलेल्या कठोर निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर सामूहिक नमाजपठणास बंदी असल्याने सलग दुसऱ्या वर्षी कॅम्प ईदगाह मैदानावर ईद-उल-फित्रचे नमाजपठण झाले नाही. त्यामुळे हे मैदान सुने सुने होते. मैदानाच्या चोहोबाजूने बॅरिकेडिंग, सीसीटीव्ही(CCTV) व चोख पोलिस बंदोबस्त होता. (Ramzan Eid festival celebrate in malegaon)

मुस्लिम बांधवांच्या संयमाचे कौतुक

मुस्लिम बांधवांनी संयमाची भूमिका घेत सामूहिक नमाजपठणास फाटा देऊन घरोघरी व मशिदीत मोजक्या जणांच्या उपस्थितीत नमाजपठण केले. सामूहिक नमाजपठणास बंदी असल्याने अनेकांनी मशिदीत न जाता घरीच कुटुंबीयांसह नमाजपठण केले. तत्पूर्वी नवे कपडे परिधान करून मुस्लिम बांधवांनी आपापल्या परिसरात एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय एकात्मता समिती, मध्यवर्ती गणेश उत्सव समिती व शिवजयंती उत्सव समितीतर्फे शुभेच्छा देत गुलाबपुष्प भेट देऊन स्वागत केले. कृषिमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, माजी आमदार रशीद शेख, आसिफ शेख आदींनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात कुठल्याही मैदानावर सामूहिक नमाजपठण न झाल्याने मुस्लिम बांधवांच्या संयमाचे कौतुक करतानाच प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

उत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट

पूर्व भागात काही दुकाने सुरू असली तरी रणरणत्या उन्हामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. ईदचा सण असूनही दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट होता. सायंकाळी मात्र बहुसंख्य तरुण दुचाकीने शहरानजीक फिरण्यासाठी गेले. सकाळी घरोघरी शिरखुर्मा व गोड पदार्थ करण्यात आले. सायंकाळी अनेक ठिकाणी विविध पदार्थ तयार करण्यात आले. नवीन कपडे, चप्पल व अन्य वस्तूंची खरेदी नेहमीप्रमाणे पार पडली. मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी जामा मशिदीत नमाजपठण केले. सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील यंत्रमाग तीन ते चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांची वाहने सातत्याने गस्त घालत होती. एकूणच उत्साह, कोरोना संसर्गाचे सावट दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT