Eidgah Rapiring
Eidgah Rapiring esakal
नाशिक

Ramzan Eid 2023 : ईदगाह मैदानावरील कामांना वेग; महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Ramzan Eid : रमजान ईदनिमित्त ईदगाह मैदानावरील विविध कामांना वेग आला आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. अवघ्या पाच दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली आहे.

शुक्रवारी (ता.२१) चंद्रदर्शन घडल्यास शनिवारी (ता.२२) रमजान ईद साजरी होणार आहे. नागरिकांकडून ईदसाठी लागणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थांसह नवीन कपडे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली जात आहे.

तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून ईदगाह मैदानावरील विविध कामांना सुरवात केली आहे. (Ramzan Eid Speed ​​up work on Eidgah ground Inspection by nmc Officers nashik news)

शहर-ए-खतीब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ईदची मुख्य सामुदायिक नमाजपठण ईदगाह मैदानावर होते. कानाकोपऱ्यातील हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव ईदच्या नमाजासाठी येथे हजेरी लावतात.

महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच आमदार, खासदार, ज्येष्ठ राजकीय पदाधिकारी उपस्थिती दर्शवून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात. सध्या ईदगाह मशीद रंगरंगोटीचे काम सुरू आहे.

मैदानातील खड्ड्यांमध्ये माती, कच टाकून खड्डे बुजविले जात आहे. मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ईदगाह मशीद तसेच मैदानावर वाढलेले गाजरगवत काढून स्वच्छता करण्याचेही काम सुरू आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

मशिदीला लागून असलेल्या ओट्यांची स्वच्छता केली जात आहे. इतकेच नाही तर नमाजाला जाण्यापूर्वी वजूह करणे अनिवार्य आहे. त्यानिमित्ताने मैदानावर तात्पुरता वजूह खाना तयार करत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील करून देण्यात येत आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करत कामांना गती देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या आहे. मुस्लिम बांधवांनीही ईदगाह मैदानावर उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला.

अतिक्रमणामुळे नाराजी

ईदगाह मैदानावर संरक्षण भिंतीस लागून नागरिकांनी अनधिकृतरीत्या अतिक्रमण केले आहे. दिवसेंदिवस येथील घर, झोपड्यांचे अतिक्रमण वाढत आहे. महापालिका प्रशासनास याबाबत निवेदन देऊनही त्यांच्याकडून डोळेझाक केली जात आहे.

त्यामुळे अतिक्रमणात भर पडत आहे. यास वेळीच आवर न घातल्यास भविष्यात ईदगाह मैदानाचे अनधिकृत लोक वस्तीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT