नाशिक

पालीभाषा दिनाच्या औचित्याने नाटकाचा प्रयोग

CD
फोटो : H31435 -- ‘रणभूमीच्या पार्श्वभूमीवर’ चे सुरेख सादरीकरण पाली भाषा दिनाच्या औचित्याने नाटकाचा प्रयोग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : धम्मपाल जयंती उत्सव तथा पाली भाषा गौरव दिनाच्या औचित्याने संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे ‘रणभूमीच्या पार्श्वभूमीवर’ पाली मराठी भाषेतील नाटकाचा प्रयोग रविवारी (ता. ४) झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या नाटकातून धम्मचक्र परिवर्तनाच्या प्रवासाचे सुरेख सादरीकरण रंगमंचावर करण्यात आले. एका चक्रवर्ती सम्राटाने तलवारीच्या बळावर मिळविलेल्या साम्राज्याचा प्रवास रक्तरंजित युद्धाकडून शांतीच्या मार्गावर कसा झाला. दोन्ही राज्यांच्या सैनिकांचा झालेला नरसंहार आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला झालेल्या यातना, दुःख त्याचे अंतर्मुख करणाऱ्या प्रसंग प्रेक्षकांना भावुक करून गेले. कलिंगाच्या नरसंहारानंतर ज्या सम्राटाने कधीही तलवार हातात न घेता जगभर शांतीचा प्रचार प्रसार कसा केला, रणभूमीवर बौद्ध भिक्खूने सम्राट अशोकाला युद्ध नको.. बुद्ध हवे.. हा संदेश कसा दिला याची मांडणी नाट्यप्रयोगातून करण्यात आली. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहित पगारे यांनी केले. नेपथ्य समाधान मुर्तडक, प्रतीक गांगुर्डे, प्रकाशयोजना रवी रहाणे,संगीत भरत कुलकर्णी, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मिलिंद साळवे यांनी केली.तर रंगमंच साहाय्य जबाबदारी अमोल पाठारे यांनी सांभाळली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, प्रा डॉ सुनील कुटे, नामदेव लोणारे, ॲडण्‍ अपर्णा पाटील, सुनील त्रिभुवन, प्रा.अस्मिता राजोळे उपस्थित होते. प्रा.अस्मिता राजोळे यांनी प्रस्तावनेत संस्थेचे उद्दिष्टे स्पष्ट केले. डॉ. शीतल देवकर यांनी सूत्रसंचालन केले. देवीदास वाटाणे यांनी आभार मानले. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT