diwali rangoli news  esakal
नाशिक

Diwali Festival: दिपावलीनिमित्त रांगोळीची बाजारपेठ सजली! 30 लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

Diwali Festival : घराच्या अंगणाची शोभा वाढवणाऱ्या रांगोळीच्या व्यवसायातून सुमारे ३० लाखापेक्षा अधिक उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. विविध रंगबेरंगी रांगोळी बाजारात उपलब्ध झाली आहे. पांढऱ्या रांगोळी सर्वाधिक मागणी आहे. (Rangoli market decorated on occasion of Diwali turnover of more than 30 lakh rupees nashik)

सण उत्सव आणि विविध सोहळ्याच्या निमित्ताने घर व्यवसायाचे अंगण आकर्षक रांगोळी काढून सजविण्याची पुरातन काळापासून परंपरा चालत आली आहे. बहुतांशी लोक आपल्या घरासमोर आणि अंगणात विविध रंगीबेरंगी रांगोळी काढतात.

दिवाळी सर्वाधिक मोठा सण असल्याने नागरिकांकडून दिवाळीच्या इतर खरेदीसह रांगोळीचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत आहे. त्या अनुषंगाने शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी लहान मोठ्या रांगोळी विक्रीच्या दुकाने सजल्या आहेत.

विविध भागात होलसेल विक्रेते देखील आहे. मेनरोड, वावरे लेन परिसरात असलेल्या होलसेल व्यावसायिकाकडून नागरिकांसह लहान मोठ्या दुकानांसाठी सुमारे तीनशे टन रांगोळी विक्री झाली आहे.

तर किरकोळ विक्रेत्यांकडून सुमारे १०० टन विक्री झाल्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यातून सुमारे २५ ते ३० लाखांची उलाढाल झाल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. रांगोळी खरेदी चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विक्रेत्यांनीही समाधान व्यक्त केले.

लाल, पिवळा, हिरवा, केशरी, निळा, पांढरा, जांभळा, गुलाबी आदींसह विविध विविध रंगात रांगोळी उपलब्ध आहे. यात पांढऱ्या रंगाच्या रांगोळी सर्वाधिक मागणी आहे.

त्याचप्रमाणे रांगोळीचे छापे, पेन, लक्ष्मी पावले गो पद्म अशा विविध प्रकारच्या संबंधित वस्तूही विक्रीस आल्या आहे. यात समाधानाची बाब म्हणजे दरात कुठल्याही प्रकारची वाढ नाही.

तसेच धावपळीच्या जीवनात आजही शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांशी गावांमध्ये रांगोळीचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे सरासरी मागणी होतच आहे.

येथून येते रांगोळी

राजस्थान येथून शहरात मोठ्या प्रमाणावर रांगोळी विक्रीस येत असते. तर शहरातील होलसेल विक्रेत्याकडून मुंबई, गुजरातचा काही भागात आणि शहर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रांगोळीची निर्यात केली जाते.

असे आहे दर

वस्तू दर

पांढरी १० रुपये किलो

विविधरंगी २० रुपये किलो

रांगोळी छापे १० ते २०० रुपयापर्यंत

लक्ष्मी पावले १० ते ३० रुपये

गो पद्म १० ते ३० रुपये

स्वस्तिक १० ते २० रुपये

रांगोळी पेन २५ ते ३० रुपये

"रांगोळी खरेदी विक्रीस उत्तम प्रतिसाद आहे. दरात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. रांगोळी काढण्याची संस्कृती टिकून असल्याने बहुतांशी प्रमाणात मागणी आहे."

- निर्मला सारसर, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT