rangpanchmi rahad.jpg 
नाशिक

VIDEO : ''कोरोनाची भिती व्यर्थ''...रहाडींवर यंदा 'रंगपंचमी' रंगणारच!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जगभर सुरू असलेल्या कोरोना विषाणुच्या थैमानाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी शहरातील सर्वच रहाडींवर रंगपंचमी रंगणार असल्याचे संकेत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. येत्या शुक्रवारच्या (ता.13) रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर जुन्या नाशकातील काजीपुऱ्यातील दंडे हनुमान मित्र मंडळाची रहाड तब्बल 55 वर्षांनंतर खोलण्यात आल्याने कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. 

पारंपारिक सणांना मोठे महत्व

नाशिक शहराला पेशवेकाला आधीपासूनची प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे सहाजिकच टेकड्याटेकड्यांवर वसलेल्या या शहराच्या अनेक भागात प्राचीन रहाडी व त्याअनुषंगाने परंपरा दिसून येते. पेशवेंच्या काळात तर रंगपंचमी आदी पारंपारिक सणांना मोठे महत्व होते. त्यामुळे शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर रंग खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रहाडी होत्या. अशा तब्बल 21 रहाडींपैकी आज केवळ चार ते पाचच रहाडी खोलण्यात येतात, यात कालौघात अनेक रहाडी नष्ट झाल्याचे दिसून येते. मात्र, पंचवटीतील शनी चौकातील मित्र मंडळाची रहाड, गंगाघाटावरील समस्त तुरेवाला पंच मंडळ, तिवंधा चौकातील रहाड व जुन्या तांबट गल्लीतील रहाड अशा चारच रहाडी सद्यस्थितीत खोलण्यात येतात. 

सर्वच मंडळांकडून रहाडींचे नियोजन

यावर्षी चीनमधून परसरलेल्या कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन काय भुमिका घेते, याबाबत औत्सुक्‍य असतानाच दुसरीकडे विविध मंडळांकडून रहाडी खोदण्याचे नियोजन सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.13) रंगपंचमी असून सर्वच मंडळांनी रहाडींचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे सर्वच मंडळे नैसर्गिक रंगांचा वापर करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे रहाडींबरोबरच रंगीत संगीत कारजांची धूमही रंगणार आहे. ​

पन्चावन्न वर्षानंतर उघडणार रहाड
 
जुन्या नाशकातील काजीपुरा परिसरातील श्री दंडे हनुमान मित्र मंडळाची रहाड यंदा खोलण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मनोज लोणारी यांनी सांगितले. तब्बल 55 वर्षानंतर याठिकाणी रंगपंचमीची धूम रंगणार आहे. आज सकाळपासून या रहाडीचे खोदकाम सुरू झाले आहे. ही रहाड तब्बल तीनशे वर्षे जुनी असावी, असे परिसरातील जुन्या जाणत्यांनी सांगितले. 1972 साली ही रहाड खोदण्यात आली होती, त्यानंतर ती बंदच होती. यामुळे येथील कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. विशेष म्हणजे याठिकाणी 3 ते 5 दरम्यानचा वेळ खास महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. नगरसेवक गजानन शेलार संस्थापक अध्यक्ष असलेल्या या मंडळाचे मनोज लोणारी विद्यमान अध्यक्ष आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT