ranbhaji
ranbhaji Sakal
नाशिक

पौष्टिक रानभाज्यांनी बहरला घाट! पावसामुळे सहज होतायत उपलब्ध

राहूल बोरसे

हरसुल (जि. नाशिक) : आदिवासी भागातील पौष्टिक व नैसर्गिक खाद्य म्हणून प्रसिद्ध रानभाज्या जंगलात सहज उपलब्ध होण्यास सुरवात झाली आहे. रानभाज्या या पावसाळ्यात पौष्टिक व परवडणारे खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. रानकंद, मोखा, वाघाटा, वास्ता, दिघवडी, उळस्याचा मोहोर, वाथरटे, भुईफोड, वास्ते या भाज्या जंगलात सहज-सहजी जंगलात उपलब्ध होत नाहीत. निसर्गामुळे वरील भाज्यांचे उत्पादन अल्प प्रमाणात मिळत असते.(large quantities of ranabhaji are available in the forests of amboli ghat and waghera ghat)


त्र्यंबकेश्वर जवळील आंबोली घाटात व हरसूलच्या वाघेरा घाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात रानभाज्या पावसामुळे मिळत आहेत. यामुळे आदिवासी भागातील ग्रामास्थांसोबतच शहरी ग्राहकांनाही रानभाज्यांचा मोह पडला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नव्वद टक्के समाज हा आदिवासी आहे. हा समाज जंगल खोऱ्यात राहत आहे. त्याला आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी रानमेव्याचा हातभार लागत आहे. रानात दिवसभर फिरून आदिवासी रानभाज्या जमा करतात. या जमा केलेल्या भाज्या त्र्यंबकेश्वर, गिरणारे, हरसूल बाजारपेठेत तसेच वाघेरा घाट व अंबोली घाट रस्त्यात विक्रीसाठी उपलब्ध असतात.

लोत, मोखा, वास्ते, वाघाटा, पेंढरे या सारख्या भाज्या नेऊन विकतात. या आदिवासी महिला १० रुपये वाटा उळस्याचा मोहोर देत असतात, वाघाटा १० रुपये पावशेर देतात. लोती २० रुपयांत ४ जुडी, पेंढरे २० रुपये पावशेर, वाघाटा १० रुपये पावशेर विकतात. या भाज्यांच्या विक्रीतून त्यांना चारशे ते पाचशे रुपये मिळतात. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली, हरसूल परिसर बाफनविहीर, खरशेत, कास, खरवळ, गावठा, खरपडी परिसरातील सर्वच आदिवासी पाड्यांना या रानभाज्या उपलब्ध असतात व विक्रीतून आर्थिक हातभार लागतो.

(large quantities of ranabhaji are available in the forests of amboli ghat and waghera ghat)


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT