Rashid Sheikh said he would not contest the Malegaon municipal corporation elections  Sakal
नाशिक

मालेगाव महापालिका निवडणूक लढविणार नाही : रशीद शेख

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कॉंग्रेस महानगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची प्रामुख्याने माझ्यावर विश्‍वास असलेल्यांची द्विधा मनस्थिती होती. आपल्या समर्थकांनी आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख (Asif Shaikh) यांना साथ द्यावी. मी स्वत: आगामी महानगरपालिका निवडणूक लढविणार नाही. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही असे माजी आमदार रशीद शेख यांनी शनिवारी (ता.१६) सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असलेला गोंधळ दूर व्हावा, यासाठी आपण हे आवाहन करीत आहे. मी व माझ्या समवेतचे कॉंग्रेस नगरसेवक कॉंग्रेसमध्येच आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खुल्या दिलाने आसिफ शेख यांची साथ द्यावी. आपण आजवर कॉंग्रेसशी एकनिष्ठ होतो. सन १९९५ मध्ये मला पक्षाने बडतर्फ केले. त्यानंतरही मी कुठल्या पक्षात गेलो नाही. जनजागरण समितीच्या नावाने स्वतंत्रपणे काम केले. विरोधक शेख कुटुंबात वितुष्ट असल्याच्या अफवा पसरवित आहेत. आमच्या कुटुंबात कधीही दुरावा नव्हता. आम्ही प्रत्येक निवडणूक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक काम एकत्रितपणेच करत आला. पक्ष आगामी काळात कॉंग्रेस अध्यक्षपदी कुणाचीही नेमणूक करु शकेल. आपण त्यांच्या नेतृत्वात काम करु. सध्यातरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना आघाडीचेच शासन आहे.


या वेळी माजी आमदार आसिफ शेख, कॉंग्रेसचे मनपा सभागृहनेते अस्लम अन्सारी, नगरसेवक सलीम अन्वर, खालीद शेख, रिजवान अहमद, इरफान शेख, सलीम अहमद, जाकीर शेख आदींसह बहुसंख्य कॉंग्रेस कार्यकते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT