फोटो : H33565
राष्ट्रसेविका समितीचे
सघोष पथसंचलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : ‘संघटनेच्या महामंत्राने, जागवू राष्ट्रशक्ती अपार, समर्पणाच्या तेजातून, घडवू तेजस्वी राष्ट्र साकार’ , या ब्रिदाप्रमाणे राष्ट्रसेविका समितीतर्फे रविवारी (ता. २५) शहरातून सघोष पथसंचलन करण्यात आले. या सघोष पथसंचलनात महिला वर्गाने घेतलेल्या उत्स्फूर्त व शिस्तबद्ध सहभागामुळे शहरातील वातावरण भारावले.
कॉलेज रोड परिसरातील एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेजच्या मैदानावर पार पडलेल्या या संचलनात महिला वर्गाचा उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध सहभाग होता. सकाळी ८ वाजता मुख्य पथसंचलनाला आरंभ झाला. घोष पथकाच्या तालावर आणि शिस्तबद्ध पावलांनी निघालेल्या या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. हे संचलन दोन नियोजित मार्गांवरून पार पडले. एचपीटी कॉलेज मैदानावरून पहिल्या वाहिनीचे संचलन सुरु झाले. मिलिनियम गेट, वृंदावन मिसळ, बॉइज टाऊन चौक, सहजीवन कॉलनी, मालपाणी हॉस्पिटल आणि व्हिजन हॉस्पिटल मार्गे कॉलेज रोडवरून वाहिनी परत मैदानावर आली. दुसऱ्या मार्गाने कॉलेज रोड सिग्नल, डी डेकोर, मॉडर्न कॅफे, रघुकुल बिल्डिंग, कुलकर्णी बाग, कलश अपार्टमेंट, ब्रँड लाउंज मार्गे श्रद्धा मॉलवरून एचपीटी मैदान येथे या संचलनाचा समारोप झाला. या संचलनादरम्यान संपूर्ण मार्गावर अत्यंत मंगलमय वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या आणि भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे उत्साहात स्वागत केले. राष्ट्रसेविका समितीच्या या संचलनामुळे नाशिकमध्ये राष्ट्रशक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.