Rasika, Maya & Priyanka esakal
नाशिक

Women Cricket Team : नाशिकची रसिका, माया, प्रियांका महाराष्ट्र क्रिकेट संघात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदे , माया सोनवणे व प्रियांका घोडके या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.

अंतिम संघ निवडीसाठी २४ सप्टेंबर पासून पुणे येथे संभाव्य खेळाडूतील चाचणी स्पर्धा सामन्यांत झालेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ही निवड आली आहे. तसेच यापूर्वीच्या हंगामात वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील या खेळाडूंची लक्षणीय कामगिरी देखील विचारात घेण्यात आली. (Rasika Maya Priyanka from Nashik selected in women Maharashtra Cricket Team Nashik Latest Marathi News psl98)

माया सोनावणे ही उत्तम फिरकीपटू असून ऑक्टोबर २०२१ अखेर डेहराडून येथे झालेल्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत मायाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या हंगामाच्या सुरवातीसच भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या संभाव्य ३५ खेळाडूंमध्ये निवड झाली होती. २०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.

पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत २०१८-१९ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. जलदगती गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज रसिका शिंदेने यापूर्वी महाराष्ट्रातर्फे १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१७ सालापासूनच आंतर शालेय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यापासून विविध वयोगटात रसिका महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते आहे.

प्रियांका घोडके आघाडीची फलंदाज व ऑफ स्पिनर आहे. २०१८-१९ च्या हंगामात, टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. प्रियांका ने देखील १९ व २३ वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही महाराष्ट्रातर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.

या निवडीमुळे नाशिकच्या व खासकरून महिला क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, तिघींच्या ह्या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, पदाधिकारी सदस्य व प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT