नाशिक

नव्याने रेशनचा लाभ नव्याने रेशनचा लाभ

CD
टुडे १, ॲंकर (रेशन दुकानातून धान्य देतानाचा संग्रहित फोटो वापरावा). ------ जिल्ह्यात लाखांवर नागरिकांना नव्याने रेशनचा लाभ मिशन सुधार अभियानात ६२ हजार अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत १ लाख ५ हजार ९९५ अतिरिक्त इष्टांक निर्माण करण्यात आला आहे. तसेच अंत्योदय योजनेसाठी ३ हजार २७४ कार्डांचा इष्टांक उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५ हजार ९९५ अतिरिक्त नागरिकांना नव्याने रेशनचा लाभ देणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय धान्याचा लाभ मिळावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या ''मिशन सुधार'' अभियानामुळे जिल्ह्यात नव्या लाभार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार २९६ अपात्र सदस्यांची ओळख पटविण्यात आली असून, त्यापैकी ६२ हजार २४१ सदस्यांची नावे रेशन कार्डमधून वगळण्यात आली आहेत. यामध्ये मृत लाभार्थ्यांच्या नावांचाही समावेश आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र, बोगस, दुबार नोंदणी असलेले तसेच मृत लाभार्थ्यांची नावे शोधून ती कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या उच्च उत्पन्न गटातील लाभार्थी आणि आयकरदात्यांच्या याद्यांचीही पडताळणी केली जात आहे. जिल्ह्यात ४७ हजार ६८५ आयकरदात्यांची यादी प्राप्त झाली असून, त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे. त्यातील सुमारे २५ हजार आयकरदात्यांची नावे वगळण्यात आली आहेत. -------------- कोट या अभियानामुळे अपात्र लाभार्थ्यांची नावे कमी होण्याबरोबरच पात्र नागरिकांसाठी रेशनचा लाभ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर शिधापत्रिका नोंदणीनंतर साधारणत: ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आरसीएमएस पोर्टल किंवा तहसील कार्यालयात अर्ज करावा. - महेश चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

Latest Marathi News Update : सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बेमुदत आंदोलनाची घोषणा; उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासाठी संघटना आक्रमक

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

SCROLL FOR NEXT