नाशिक

धुळे रेशन परवाना

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 33622 धुळे : खंडलाय बुद्रुकमधील रेशन दुकानाबाबत जिल्हा पुरवठा विभागाला निवेदन देताना तक्रारदारांसह ग्रामस्थ. -- रेशन दुकानाचा परवाना निलंबित - खंडलाय बुद्रुक : साडेतीन लाखांवर वसुलीचा आदेश सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : खंडलाय बुद्रुक (ता. धुळे) येथील रास्त भाव दुकान क्रमांक ६३ मधील धान्यवाटपातील अनियमितता व तफावतीप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाने कठोर प्रशासकीय कारवाई केली आहे. या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असून, गहू व तांदळाच्या साठ्यात तफावत आढळल्याने ३ लाख ६७ हजार ५४४ रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामदक्षता समितीचे सदस्य तथा समता परिषदेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पगारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला ही कारवाई झाली आहे. खंडलाय बु. येथील परवानाधारक भगवान धुडकू पाटील यांच्या दुकानात लाभार्थ्यांना वेळेवर व पूर्ण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा न जुळल्याचे कारण सांगून धान्यवाटपात अडथळे आणले जात होते. तसेच, ऑनलाइन नोंदी आणि प्रत्यक्ष वाटपात तफावत असल्याबाबत ग्रामस्थ व आदिवासी शिधापत्रिकाधारकांनी आवाज उठवला होता. या प्रकरणी तक्रारदार पगारे यांनी पाठपुरावा करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गहू ३१.७० क्विंटल आणि तांदूळ ६०.९९ क्विंटलच्या तफावतीपोटी एकूण तीन लाख ६७ हजार ५४४ रुपयांची रक्कम शासनजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत ही रक्कम न भरल्यास आणखी कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे रेशन वितरणातील पारदर्शकता ऐरणीवर आली असून, ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे श्री. पगारे यांनी नमूद करत कारवाईबद्दल जिल्हा पुरवठा विभाग व तहसील प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप

Pune Crime : बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड; पाच लाख ६४ हजारांच्या नोटा जप्त

SCROLL FOR NEXT