credai.png 
नाशिक

क्रेडाई नाशिक मेट्रोची जबाबदारी आता 'या' तिघांच्या खांद्यावर!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन यांची निवड झाली असून शुक्रवारी (ता.1) त्यांनी पदभार स्विकारला. क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी  निवड करण्यात आली. यात मागील कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष असलेल्या रवी महाजन यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

झूम कॉन्फरन्स बैठकीत निवड

उपाध्यक्षपदी नरेश कारडा यांच्यासोबत मागील कार्यकारिणीतील सरचिटणीस कृणाल पाटील यांना बढती देण्यात आली असून या कार्यकारिणीचे सरचिटणीस म्हणून गौरव ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झूम कॉन्फरन्स बैठकीत ही निवड करण्यात आली. या कॉन्फरन्समध्ये माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कृणाल पाटील यांनीदेखील सरचिटणीस पदाचा पदभार गौरव ठक्कर यांच्याकडे सुपूर्त केला. 

बांधकाम क्षेत्राच्या स्थैर्यासाठी करणार प्रयत्न 

बांधकाम क्षेत्राला येत्या वर्षात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करुन देण्यासोबतच व्यवसायाला गती देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT