नाशिक

पटेल विद्यालयाचा राज्यस्तरावर डंका

CD
धुळे : टुडे पान ४ साठी.... -- फोटो क्रमांक : 33796 नागपूर : राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना आर. सी. पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आदी. -- शिरपूरच्या पटेल विद्यालयाचा राज्यस्तरावर डंका -- विज्ञान नाट्योत्सवात राज्यात तृतीय, सार्थक हजारे उत्कृष्ट कलाकार सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २८ : नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत येथील आर. सी. पटेल माध्यमिक व कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यांमधून झालेल्या या स्पर्धांमध्ये विद्यालयाला चार हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मानपत्र मिळाले. तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंतच्या या नाटिकांमध्ये विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक संदेश हजारे याला उत्कृष्ट कलाकार म्हणून गौरविण्यात आले. त्याला दोन हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. - विद्यार्थ्यांची ही कामगिरी जिद्द, प्रतिभा आणि सांघिक प्रयत्नांचा विजय असल्याचे मानले जात आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अमरीशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, खजिनदार बबनलाल अग्रवाल, सचिव रेषा पटेल, विश्वस्त अतुल भंडारी, विजय भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनीष पवार, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर बागुल, शिरपूर गटशिक्षणाधिकारी विठ्ठल घुगे, शिरपूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बाविस्कर, संस्थेचे अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, पर्यवेक्षक वाय. व्ही. कोठावदे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना सोनाली पाटील, आरती राठोड, पी. के. पाटील, एम. व्ही. पावरा यांचे मार्गदर्शन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT