नाशिक

राजवाडे ग्रंथालय निबंध स्पर्धा

CD
धुळे टुडे २ साठी...अँकर (शिल्लक) --- फोटो-NSK26H34011 धुळे : वाचन प्रेरणा दिनानिमित्त राजवाडे मंडळाच्या ग्रंथालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील पारितोषिकेप्राप्त विद्यार्थ्यांसह मंडळ व ग्रंथालयाचे पदाधिकारी. --- निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांना लेखनाची प्रेरणा --- वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने राजवाडे मंडळ ग्रंथालयाचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून राजवाडे संशोधन मंडळाच्या ग्रंथालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धुळे शहरातील विविध शाळांमधून सुमारे २०० निबंध प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने व अभ्यासपूर्ण मांडणीने परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्याहस्ते झाला. राजवाडे संशोधन मंडळाच्या वस्तुसंग्रहालय दालनात बक्षीस वितरण समारंभ झाला. मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा अध्यक्षस्थानी होते. संशोधन अधिकारी मृदुला वर्मा, संशोधक संपादक प्राचार्य डॉ. अनिल बैसाणे उपस्थित होते. परीक्षक श्रीमती वर्मा यांनी सर्व सहभागी शाळा, विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. विशेषतः उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या निबंधांचे कौतुक करत, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत प्रभावी व मुद्देसूद लेखन करणे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचार्य डॉ. बैसाणे यांनी स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल खंत व्यक्त केली. पुस्तक हा विद्यार्थ्यांचा खरा मित्र असून त्यातूनच ज्ञानाची व विचारांची समृद्धी घडते. त्यामुळे सर्वांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्याध्यक्ष मुंदडा यांनी राजवाडे संशोधन मंडळ शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड, संशोधनाची जिज्ञासा आणि इतिहासाचा अभिमान निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह व मित्रांसह या ऐतिहासिक ठेव्याला आणि वस्तुसंग्रहालयाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन केले. ग्रंथालय सचिव जयश्री शहा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कलाम यांना कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. ग्रंथालय लिपिक रेणुका शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भूषण बर्गे यांनी आभार मानले. ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. --- ...चौकट... पारितोषिकेप्राप्त विद्यार्थी प्रथम- रिद्धी संदीप पाटील (जय हिंद हायस्कूल), द्वितीय- पद्मिनी भूषण पवार (जिजामाता कन्या विद्यालय), तृतीय- सुफियान रसौद्दीन शेख (एल. एम. सरदार उर्दू हायस्कूल). उत्तेजनार्थ- आरुषी सुंजे, तनिष करंके, गौरी गवळे, आफिया अंजुम शेख अरमान, दिव्यानी बोरसे, जिग्नेश माळी, मंजिरी सोनवणे आणि वर्षा गांगुर्डे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरुख खानच्या बहिणीला पाहिलंत का? प्रसिद्धीपासून दूर, काय करते किंग खानची सख्खी बहीण?

सूर्याच्या राशीबदलाने ८ राशींचे अच्छे दिन! नोकरी, पैसा अन् व्यवसायात होणार मोठे बदल

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकाची भरारी! PSI, नायब तहसीलदार ते DySP जिद्दीचा प्रवास; शिवप्रसाद पारवेंची स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी..

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

SCROLL FOR NEXT