नाशिक

वाचनातून घडते समृद्ध व्यक्तिमत्त्व’ : विवेकानंद पाटील क. का. वाघ पिंपळगाव बसवंत

CD
फोटो ओळ; 10287 पिंपळगाव बसवंत ः क. का. वाघ महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात बोलताना विवेकानंद पाटील. शेजारी विलास भवर, गंगाधर निखाडे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, डॉ. साहेबराव मोरे, कवी संदीप जगताप, डॉ. संदीप माळी, प्रा. धनंजय देशमुख आदी. वाचनातून घडते समृद्ध व्यक्तिमत्त्व विवेकानंद पाटील ः क. का. वाघ पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात व्याख्यान सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. २ ः वाचनामुळे ज्ञान, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. पुस्तके ही माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे प्रतिपादन विवेकानंद पाटील यांनी केले. पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानत ते बोलत होते. विलास भवर, गंगाधर निखाडे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, डॉ. साहेबराव मोरे, कवी संदीप जगताप, डॉ. संदीप माळी,प्रा. धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. विवेकानंद पाटील म्हणाले, की, वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. वाचनातून माणसाची विचारक्षमता, कल्पनाशक्ती, भाषिक कौशल्ये आणि निर्णयक्षमता विकसित होते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. तसेच सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि सदसद्विवेकबुद्धी विकसित होते. डॉ. व्ही. बी. कदम म्हणाले, की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे. संदीप जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करन दिला. प्रा. धनंजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिलीप माळोदे यांनी आभार मानले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

Chhatrapati Shahaji Raje and Sambhaji Maharaj Samadhi Controversy : छत्रपती शहाजीराजे भोसले व थोरले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी मेघडंबऱ्या उभारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर कर्नाटक पोलिसांकडून गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT