नाशिक

तयार फराळाला पसंती; पर्यावरणपूरक भेटवस्तूंवर भर

CD
तयार फराळाला पसंती; पर्यावरणपूरक भेटवस्तूंवर भर दिवाळीत घराघरात चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळे, लाडू आणि चिवड्याचा दरवळ ठरलेला असतो मात्र, बदलत्या जीवनशैलीत नोकरी आणि घराची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना कामानिमित्त फराळ तयार करणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या तयार फराळाची चलती आहे. प्रशांत भरवीरकर बाजारात पारंपरिक फराळाबरोबरच गोड आणि तिखट पदार्थांचेही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. भाजणीची चकली, करंजी, अनारसे, साटोरी, चिरोटी, गोड-खारे शंकरपाळे, जिरापुरी, बाकरवडी, चिवडा, लाडू अशा पदार्थांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, साजूक तुपातील पदार्थांनाही मागणी असून, चवीबरोबरच दर्जाला महत्त्व दिले जात आहे. शेव-भाजणी चकली, करंजी आणि अनारसे प्रत्येकी ५४० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. साजूक तुपातील अनारसे एक हजार रुपये किलो, तर साजूक तुपातील बेसन लाडू ६०० रुपये किलो आहेत. गोड आणि खारे शंकरपाळे प्रत्येकी ३२० रुपये, पातळ पोहे चिवडा ३६० रुपये, भाजके पोहे चिवडा आणि मका चिवडा प्रत्येकी ३२० रुपये किलो दराने मिळत आहेत. गोड पदार्थांमध्ये बुंदी आणि बेसन लाडू प्रत्येकी ४०० रुपये, रवा लाडू ३०० रुपये, तर डिंक आणि मेथी लाडू एक हजार रुपये किलो आहेत. --- पर्यावरणपूरक भेटवस्तूंवर भर दिवाळीत पूर्वी मिठाईचे बॉक्स, सुकामेवा आणि आकर्षक डबे यांपुरती मर्यादित असलेली दिवाळीची भेटवस्तूंची परंपरा आता बदलत आहे. यंदा नाशिककरांकडून पारंपरिक भेटवस्तूंसोबतच आकर्षक पॅकेजिंग, वैयक्तिक नाव असलेल्या वस्तू, पर्यावरणपूरक भेटवस्तू आणि अनुभवाधारित गिफ्ट्सना पसंती मिळत आहे. भेटवस्तूची किंमत किती, यापेक्षा ती किती वेगळी आणि समोरच्या व्यक्तीच्या आवडीची आहे, याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. नाव कोरलेले मग, फोटोफ्रेम, आकर्षक दिवे, सुगंधी मेणबत्त्या, शोभेच्या वस्तू, हस्तनिर्मित कलाकुसरीच्या वस्तू, बांबू किंवा मातीपासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. विशेषतः तरुणाईमध्ये स्वतःसाठीही आवडीची भेटवस्तू खरेदी करण्याचा ''सेल्फ गिफ्टिंग''चा ट्रेंड वाढताना दिसत आहे. --- हेल्दी गिफ्टिलाही पसंती साखरविरहित मिठाई, विविध प्रकारचे फ्लेवर्ड ड्रायफ्रूट्स, खजूर, बदाम, अक्रोड, काजू यांचे आकर्षक कॉम्बिनेशन असलेल्या हॅम्पर्सना पसंती मिळत आहे. चॉकलेट्स, कुकीज, कॉफी, चहा आणि स्थानिक खाद्यपदार्थ यांची एकत्रित मांडणी असलेले गिफ्ट बॉक्सही आकर्षण ठरत आहेत. पारंपरिक फराळाला आधुनिक पॅकेजिंगची जोड दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

SCROLL FOR NEXT