Dr. Ashok Karanjkar esakal
नाशिक

NMC News: परवानगी नाकारण्याचा निर्णय धोकादायक; आयुक्त डॉ. करंजकर फेरविचार करणार

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहरात आगामी दोन वर्षासाठी ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी नाकारण्याचा निर्णय रिअल इस्टेट क्षेत्राला धोकादायक ठरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे सांगितले.

नगररचना विभागाच्या निर्णयामुळे नाशिकचे रिअल इस्टेट क्षेत्र अडचणीत सापडणार आहे. नगररचना विभागाने घेतलेल्या निर्णयाची कल्पना आयुक्तांना नव्हती.

भविष्यात रिअल इस्टेट क्षेत्र धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्त करंजकर यांनी तातडीने फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय मागे घेतला जाईल, अशी माहिती ‘सकाळ’ ला दिली.

नगररचना व अग्निशमनची भूमिका संशयास्पद

२००८ मध्ये ३० मीटर उंचीच्या इमारतींसाठी ३२ मीटर उंचीवर पोचेल, अशी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत खरेदी केलेल्या हायड्रोलिक प्लॅटफॉर्मचा उपयोग झाला नाही.

महापालिकेकडे ३२ मीटर उंचीपर्यंत पोचेल एवढी हायड्रोलिक शिडी असतानादेखील अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली गेली. असे असताना एखादी कंपनी दिवाळखोरीत गेली म्हणून नाशिक शहराचे अर्थकारण थांबविण्यामागचे कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचप्रमाणे फिनलँड येथील कंपनी नियुक्त करताना अग्निशमन विभागाने कंपनीचा पूर्वेतिहास का तपासला नाही, असादेखील सवाल उपस्थित होत आहे.

"नगररचना विभागाने ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना दोन वर्षासाठी परवानगी नाकारल्याचे आत्ताच समजले. परंतु निर्णयाचा फेरविचार करून निर्णय रद्द करू."

- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SIR: मोठी बातमी! महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत 33 टक्के मतदारांची नावे वगळली? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Government IPO: मोदी सरकारचा मोठा प्लॅन! 3 सरकारी कंपन्यांचे IPO आणण्याची तयारी; जाणून घ्या डिटेल्स

Vishwajeet Kadam Warning to Government : सांगलीला पाणी द्या! "कोणी आडवं आलं तर गाठ माझ्याशी!"; विश्वजीत कदमांचा मंत्री शंभूराज देसाईंना थेट इशारा!

SHUKRA UDAY 2026 ASTRO PREDICTIONS: नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार? शुक्राच्या उदयाने धनलाभासह करिअरमध्येही येणार प्रगतीचे योग!

Maharashtra Live News: बंद कार्डधारकाचा माल पूर्ववत करण्यासाठी काँग्रेसचे धरणे

SCROLL FOR NEXT