solar agricultural pump.jpg 
नाशिक

वीज जोडणीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा!...आता दिवसा सिंचन शक्य होणार

सकाळवृत्तसेवा

नाशिक : ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी घेतलेली किंवा काही कारणा स्तव वीज जोडणीस विलंब होत आहे अशा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेसाठी प्राधान्य देण्यात आल्यामुळे नाशिक आणि नगर जिल्ह्यात १ हजार ८४० सौर कृषीपंप कार्यन्वित झाल्याची माहिती नाशिक परिमंडळाकडून देण्यात आली. अटल सौर कृषीपंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत वंचित शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्याने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. 

नाशिक शहर मंडळातील १ हजार ४९ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रु पये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर पाच एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७१० रुपये (१० टक्के) एवढी रक्कम भरायची होती. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी नाशिक परिमंडळाअंतर्गत असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे. त्यामध्ये नाशिक शहर मंडळातील १ हजार ४९, मालेगाव मंडळातील १९५ तर अहमदनगर मंडळातील ५९६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. 

वीजबिलाचा किंवा डिझेलचा खर्च वाचणार

बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील ४०९ आदिर दुसऱ्या टप्यातील ५०३ शेतऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. नाशिक परिमंडळातील एकूण १८४० शेतकऱ्यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य होणार आहे. यात वीजपुरवठा खंडित होण्याचा, विजेच्या कमी दाबाचा प्रश्नच निर्माण होत नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलाचा किंवा डिझेलचा खर्च वाचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

Dope Test Before Marriage: नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग सिरीजची रिलीज डेट जाहीर ! विजय वर्मा साकारणार मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT