Inflow of onions to onion traders in Nampur esakal
नाशिक

Nashik Onion News: नामपूरला कांद्याची विक्रमी आवक! सरासरी 22 रूपयांचा भाव

लिलावानंतर रोख पेमेंट घेण्याचे बाजार समितीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात शुक्रवारी (ता.२) १ हजार ५५० वाहनांमधून सुमारे ३३ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.

या कांद्याला २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल असा सर्वोच्च तर २ हजार ते २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाला.

ही माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे, उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली. (Record arrival of onion to Nampur average price of 22 rupees News)

कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाल्याने केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य ४० टक्के वाढविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यात विविध शेतकरी संघटनांनी रास्तारोको आंदोलने केली. शुक्रवारी (ता.१) येथील बाजार समिती, करंजाड उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.

मोसम खोऱ्यात, परिसरातील साक्री तालुक्यात यंदा विक्रमी कांदा शेतकऱ्यांकडे होता. परंतु रोगट हवामानामुळे कांद्याचे आयुष्य कमी झाल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे.

मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील भरून निघत नव्हता. कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहे.

कांद्याचे दर काही प्रमाणात टिकून असल्याने उन्हाळ कांद्याची बाजारात विक्रमी आवक होत आहे. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे नळकस रस्त्यालगत वाहतूक विस्कळित झाली होती.

परिसरातून येथील बाजार समितीत, करंजाड उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सकाळी दहापासून लिलावाला सुरवात झाली. नामपूरला ८४९ वाहने तर करंजाडला ६९१ वाहनांचे लिलाव करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

बाजारभाव, वाहनांची संख्या (नामपूर बाजार समिती)

- २२००/२५००₹ : १७५ वाहने

- २०००/२२००₹ : ३०१

- १५००/२०००₹ : ७५

- १०००/१५००₹ : २१७

- ८००/१०००₹ : ४२

- २००/८००₹ : ३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT