Entry Tax Collection esakal
नाशिक

Nashik News : एन्ट्रीसाठी जिल्हाभर महामार्ग पोलिसांकडून वसुली! भाविकांसह पर्यटकांना बसतोय भूर्दंड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात परराज्यातील वाहनांची एन्ट्री करताच महामार्ग पोलिसांकडून या ना त्या कारणावरून वसुली केली जात आहे. महामार्ग पोलिसांच्या या वसुलीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांनाही बसतो आहे.

विशेषतः: शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची वाहने अडवून महामार्ग पोलिसांकडून वसुली केली जात असल्याने या भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकारामुळे पर राज्यात महाराष्ट्रातील भाविक गेल्यास त्यांना राज्याच्या बदनामीला सामोरे जावे लागत आहे. (Recovery from highway police across the district for entry Tourists with devotees facing problem Nashik News)

नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून गुजरात राज्य आहे. त्याचप्रमाणे धुळे, नगर आणि पालघर जिल्ह्याच्या सीमाही लागून आहेत. तसेच, परजिल्हा वा परराज्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहनांनाही नाशिकमधूनच जावे लागते.

नाशिक शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या सीमारेषा ठरलेल्या आहेत. मात्र, महामार्ग व राज्य महामार्गांवर महामार्ग पोलिसांच्या पथकांकडून टेहेळणी केली जाते. यासाठी महामार्ग पोलिसांचे स्वतंत्र पथके तैनात करण्यात आलेली आहे.

या पथकांचे सीमावर्ती भागात चेकनाके आहेत. या चेक नाक्यांच्या ठिकाणी महामार्ग पोलिसांकडून एन्ट्री पॉइंट करण्यात आलेले आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी नाकाबंदी करीत प्रवासी वाहनांसह अवजड वाहनांची तपासणीही महामार्ग पोलिसांकडून केली जाते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महामार्ग पोलिसांकडून जिल्ह्यातील चेकनाक्यांवर वाहनांकडून एन्ट्री वसुली केली जात आहे. अवजड वाहनांची अडवणूक केली जाते. तर, परजिल्ह्यातून वा परराज्यातून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचीही अडवणूक सुरू आहेत.

जिल्ह्यात एन्ट्रीच्या नावाखाली या महामार्ग पोलिसांकडून आर्थिक वसुली केली जात असल्याचे भाविकांनी सांगितले. पालघर जिल्ह्याला लागून दीव-दमण-नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशातून अवैधरीत्या मद्याची वाहतूक नाशिक जिल्ह्यातून केली जाते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाही ही वाहतूक थांबलेली नाही. मात्र महामार्ग पोलिसांचे चेकनाके असतानाही अशी वाहने नाशिकमध्ये येतातच कसे, याचा आश्‍चर्य व्यक्त होते. त्याचप्रमाणे, जिल्ह्याला लागून गुजरात राज्याची मोठी सीमा आहे.

या भागातही महामार्ग पोलिसांचे चेकनाके असून याठिकाणीही येणाऱ्या वाहनचालकांकडून एन्ट्रीच्या नावाखाली अवैधरीत्या वसुली केली जाते. नाशिक-पुणे रोडवरील नांदूरशिंगोटे शिवार, नाशिक -शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारातही महामार्ग पोलिसांचे चेकनाके असून याठिकाणीही एन्ट्रीच्या नावाखाली वसुली केली जाते.

भाविकांना त्रास

शिर्डी, सप्तश्रुंगगड, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर याठिकाणी देवदर्शनासाठी परजिल्हा वा परराज्यातील मोठ्या संख्येने भाविक येतात. सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्याने भाविकांचे येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांकडूनही दिवसरात्र एन्ट्रीच्या नावाखाली वसुली जोरात सुरू झाली आहे.

भाविकांच्या प्रवासी वाहनांना अडवून कागदपत्रांसह प्रवासी संख्या, टपावर प्रवासी सामान असे वा अन्य कोणत्याही कारणावरून प्रवासी वाहनांची अडवणूक केली जाते. त्यामुळे नाशिक व आसपासच्या परिसरातील देवदर्शनासाठी येणारे भाविक त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT