नाशिक

दोंडाईचा.. कृषीउत्पन्न बाजार समितीत लाला मिरचीची आवक घटली

CD
पान चार मेन B04388 दोंडाईचा : बाजार समितीत लाल मिरचीचा भाव ठरविताना व्यापारी. दुष्काळाचा लाल मिरचीच्या उत्पादनाला फटका ओली लाल मिरची प्रतिक्विंटल साडेपाच ते आठ हजार रुपये दराने; आवक घटल्याने परिणाम सकाळ वृत्तसेवा दोंडाईचा, ता. १६ : यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका लाल मिरचीच्या उत्पादनाला बसला आहे. उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घट झाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक कमालीची घटली आहे. बाजारात आवक कमी आणि मागणी कायम असल्याने मिरचीचे भाव कडाडले असून, सध्या ओली व अर्धओली लाल मिरची प्रतिक्विंटल साडेपाच हजार ते आठ हजार रुपये दराने विकली जात आहे. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती ही परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मिरची पिकाच्या वाढीवर आणि एकूण उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पाण्याअभावी पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनात जवळपास निम्म्याने घट झाली असून, त्याचा थेट परिणाम बाजार समितीतील आवकेवर दिसून येत आहे. सध्या बाजार समितीत दररोज साधारण २०० ते ३०० क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे. आवक कमी झाल्याने बाजारात मिरचीला तेजी आली असून शेतकऱ्यांना मिळणारा दर वरवर समाधानकारक दिसत आहे. मात्र, एकूण उत्पादनातच मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा होताना दिसत नाही. लागवड, मशागत, खते आणि महागड्या औषधांवर झालेला खर्च मोठा असल्याने या भाववाढीतून उत्पादन खर्चाची भरपाई होणे कठीण बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. -------------- लाल मिरचीकडे कल दरम्यान, हिरव्या मिरचीला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी आता लाल मिरचीच्या उत्पादनाकडे अधिक वळू लागले आहेत. आगामी काळात लाल मिरचीची आवक काहीशी वाढू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता आणि पिकांची सद्यःस्थिती यावरच पुढील उत्पादनाचे चित्र अवलंबून राहणार आहे. यंदा ४० उत्पादन कमी झाले आहे. ओली मिरचीचे दुपटीने भाव वाढले आहेत. वीस ते तीस वाहन बाजार समितीत येत आहेत सुमारे दोनशे ते तीनशे क्विंटलची लाल मिरचीची आवक आहे. लागवड चांगली होती. मात्र पाऊस नसल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. - बबलु मन्सुरी, मिरची व्यापारी, गरीबनवाज ट्रेडर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT