nashik sakal
नाशिक

मुंबईच्या धर्तीवर जुन्या इमारतींचा पुनर्विकास

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची नगरविकासमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबईच्या धर्तीवर शहरातील ३० ते ४० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रोत्साहन एफएसआय मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेचे गटनेते विलास शिंदे आदींनी मंत्री शिंदे यांची भेट घेतली. शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार शहरात अनेक इमारती विकसित करण्यात आल्या. त्यातील अनेक इमारतींचे आर्युमान ३०-५० वर्षे पूर्ण झाले आहे, तर अनेक इमारती मोडकळीस येत असून, धोकादायक म्हणून नोंद झाली आहे. या इमारतींमधील रहिवाशांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने नवीन सदनिका खरेदी करणे परवडणारे नाही.

महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अनेक सवलती दिल्या. परंतु, नाशिक शहरात अद्यापही अनेक इमारती सहा ते साडे सात मीटर रुंदीच्या रस्त्यालगत असल्याने या इमारतींचा पुनर्विकास होणे अशक्य आहे. नव्याने मंजूर झालेल्या विकास नियंत्रण नियमावलीत प्रोत्साहनपर एफएसआय पुनर्विकासासाठी मिळत आहे. मुंबईच्या धर्तीवर त्यात वाढ करून एफएसआय वाढवून दिल्यास अरुंद रस्त्यावरील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या माध्यमातून महापालिका व शासनाच्या महसुलातदेखील वाढ होईल. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास होऊन भविष्यातील दुर्घटना टळेल, या आशयाचे निवेदन नगरविकास मंत्र्यांना सादर करण्यात आले. या विषयावर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी देताना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती श्री. बोरस्ते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT