Nursing esakal
नाशिक

Nursing CET Exam: नर्सिंग सीईटीच्‍या नोंदणीची 29 पर्यंत मुदत! नोंदणी प्रक्रियेला सुरवात

राज्‍यभरातील नर्सिंग महाविद्यालयात बी.एस्सी (नर्सिंग) या पदवी अभ्यासक्रमास सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्‍यभरातील नर्सिंग महाविद्यालयात बी.एस्सी (नर्सिंग) या पदवी अभ्यासक्रमास सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सीईटी परीक्षेला प्रविष्ट होण्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

विद्यार्थ्यांना २९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येतील. शिक्षणशास्‍त्र शाखेच्‍या अभ्यासक्रमांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली असून, गुरुवार (ता.१५) पर्यंत विद्यार्थी विविध सीईटीसाठी अर्ज करू शकतील. (Registration deadline for Nursing CET exam till 29th Start registration process nashik news)

सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. टप्‍याटप्‍याने अर्ज प्रक्रिया पार पडते आहे. गेल्‍या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासदेखील राज्‍यस्‍तरावरील सीईटी परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिले जात असतात. इतर विविध शिक्षणक्रमांच्‍या नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्यांत आहे.

दरम्‍यान नर्सिंग अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षा नोंदणीला सुरवात झाली असून, सध्याच्‍या वेळापत्रकानुसार २९ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतील. ऑनलाइन शुल्‍क भरण्यासाठी १ मार्चपर्यंत मुदत असेल.

शिक्षणशास्‍त्र शाखेतील बीएड-एम.एड इंटिग्रेटेड (३ वर्षे), एम.एड., एम.पी.एड., बी.एड (नियमित व विशेष) आणि बी.पी.एड. या अभ्यासक्रमांच्‍या सीईटीकरीता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. काल (ता.१२) नोंदणी मुदत संपत असताना आता पात्रताधारक विद्यार्थ्यांना गुरुवार(ता.१५) पर्यंत अर्ज करून शुल्‍क भरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT