शहर टुडे पान चारसाठी
-------------------
भंगार बाजारातील गाळेधारकांचे
पुनर्वसन करण्याची मागणी
------
एपीसीआर व एकता संघटनेचे महापालिका आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : भंगार बाजारातील कारवाईमुळे प्रभावित झालेल्या ११७ गाळेधारकांचे पुनर्वसन करावे, त्यांच्या मालमत्ता व व्यवसाय साहित्याच्या झालेल्या नुकसानीची कायदेशीर पद्धतीने भरपाई देण्याची मागणी असोसिएशन फॉर पीस अँड जस्टिस (एपीसीआर) महाराष्ट्र व एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्याकडे केली.
एपीसीआर महाराष्ट्रचे सचिव शाकीर शेख व एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.६) आयुक्तांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत गाळेधारकांचे पुनर्वसन, नुकसानभरपाई व विविध न्यायालयीन व प्रशासकीय प्रकरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरविकास विभागातील प्रलंबित अपील, जळगाव सेशन कोर्टातील दावा व औरंगाबाद खंडपीठातील प्रकरणाचा सद्यःस्थिती अहवाल व न्यायालयीन आदेश विचारात घेऊनच पुढील कार्यवाही करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. अनेक वर्षांपासून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या गाळेधारकांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व संबंधित कागदपत्रे व न्यायालयीन प्रकरणांचा कायदेशीर आढावा घेऊन कायद्याच्या चौकटीत पुनर्वसनाचा मार्ग काढावा, अशीही मागणी करण्यात आली. आयुक्त जीवने यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत कायद्यानुसार योग्य कार्यवाही करण्यासोबतच मानवतेच्या दृष्टिकोनातून जे शक्य आहे, ते करण्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला. या शिष्टमंडळात ॲड. हमजा मिर्झा, ॲड. कलीमुद्दीन शेख, आरिफ देशमुख, ॲड. जफर मिर्झा, अनिस शहा, हाफिज रहीम पटेल, नजमोद्दीन शेख, रज्जाक पटेल, रहीम शेख आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.