Horn
Horn esakal
नाशिक

Nashik News : धार्मिक स्थळांवरील भोंगे ठरताहेत डोकेदुखी! किमान परीक्षाकाळात भान राखण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर (जि. नाशिक) : अलीकडे सर्वत्र धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचे आवाज मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भल्या पहाटेपासूनच विविध धार्मिक स्थळांवर स्पीकर वाजायला सुरवात होते. योग्य काळ, वेळेला हरकत नाही;

परंतु या वाढलेल्या आवाजांचा इतरांना त्रास होईल, याचा कोणीही विचार करत नसल्याने सर्वसामान्य पालकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (religious places bhonga voice problem appeal students demand stop during examination period Nashik News)

दहावी-बारावीच्या परीक्षा काळात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठा आवाज मुलांच्या अभ्यासावर परिणाम करणारा असून, पोलिस यंत्रणेसह जागरूक नागरिक व प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

शहरासह ग्रामीण भागात मंदिर, मशिद यांसारख्या धार्मिक स्थळांवर ध्वनिवर्धक आहेत. सकाळच्या प्रार्थनेपासूनच या आवाजाला सुरवात होते. परीक्षा काळात काही विद्यार्थ्यांची मानसिकता वेगळी असते.

त्यातच शहर व परिसरातील कर्णकर्कश आवाज, गर्दी, गोंगाट या वातावरणातून वेळ काढून शांतपणे अभ्यास करण्यावर ते भर देतात. मात्र पहाटे व सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक व भोंग्याच्या आवाजाने पूर्णतः डिस्टर्ब होतात.

विशेष म्हणजे यंदापासून परीक्षेबाबत कडक अंमलबजावणी असल्याने कॉपीचा आधार असलेल्यांनाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागले आहे. त्यातच वातावरण शांत असण्याची आवश्यकता असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

धार्मिक स्थळांवर स्पीकर लावू नये, याबाबत पालकांचा आक्षेप नाही. मात्र, मंदिराबाहेर आवाज जाणार नाही, याची योग्य काळजी घ्यावी. जेणेकरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह कोणालाही त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. आवाजाच्या नियमांसह ‘सायलेन्स झोन’बाबत शहरात ठिकठिकाणी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

‘सायलेन्स झोन’चीही तमा नाही

‘सायलेन्स झोन’च्या ठिकाणी १०० मीटरच्या परिघात कुठेही स्पीकर किंवा मोठ्या आवाजातली वाद्य वाजवण्यास मनाई आहे. लग्नसराईमुळे प्रचंड मोठ्या आवाजात डीजे व डिजिटल साउंड वाजवले जातात.

कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा न बाळगता आजूबाजूला दवाखाना आहे की बालरुग्णालय आहे, याचाही विचार केला जात नाही. त्यामुळे शहरात ‘सायलेन्स झोन’ नावाची बाब अजिबातच राहिलेली नाही, याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन शांतता परिसर निश्‍चित केलेल्या भागात डीजेचा कर्णकर्कश धुमाकूळ थांबवावा.

बरेचदा लग्नसराई असलेल्या कुटुंबापेक्षा बाहेरची मंडळी ‘वाढव आवाज’ म्हणत नाचण्यात दंग होतात. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित रुग्णांच्या हृदयाला तीव्र आवाजाने हादरे बसून त्रास होतो. छोट्या बालकांच्या कानातही इजा होऊ शकते. त्यामुळे शांतता परिसरात बॅन्ड व डीजेवर बंधन घालावीत.

"डीजेसारख्या वाद्यांचा दणदणाट इतका आहे, की त्यामुळे परिसर हादरतो. शहरात शांतता झोन नावाची बाब अस्तित्वात आहे की नाही? लहान बाळांच्या कानाला कानठळ्या बसतात. वयोवृद्ध व हृदयविकाराच्या रुग्णांना जोराचा आवाज त्रासदायक ठरतो. याबाबत संबंधित यंत्रणेने जागरूकता व प्रबोधनात्मक कारवाई करण्याची गरज आहे."

-डॉ. टी. पी. देवरे, बारा बंगला, मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT