election esakal
नाशिक

Market Committee Election: स्थगिती हटविल्याने ‘त्या’ 78 संचालकांची नावे वगळणार! पुढील सुनावणी 10 एप्रिलला

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणूक मतदार यादीतून ७८ संचालकांची नावे वगळण्याच्या शासन व जिल्हा निबंधकांनी दिलेल्या निर्णयाला दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

ती मागे घेण्याचा निर्णय गुरुवारी (ता. ३०) दिल्याने मतदारयादीतून ‘त्या’ सहा सोसायटीच्या ७८ संचालकाची नावे अपात्र ठरविण्याचा शासन निर्णय कायम राहिला आहे. पुढील सुनावणी येत्या १० एप्रिलला होणार आहे. त्याकडे बनकर-कदम गटासह सर्वांचे लक्ष लागले आहे. (removing suspension names of those 78 directors will omitted Next hearing on April 10 Market Committee Election nashik news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आमदार दिलीप बनकर यांनी निर्माण केलेल्या सहा सोसायट्यांच्या ७८ संचालकांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय शासन व जिल्हा निबंधकांनी दिला होता. त्यावर आमदार बनकर यांनी दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली होती.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आपला दोन दिवसांपूर्वीचा निर्णय मागे घेत शासन निर्णयाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे त्या ७८ संचालकांची नावे मतदार यादीतून बाद होणार आहेत. आता सोसायटी गटातील मतदारांची संख्या घटून ९३० एवढी झाली आहे. पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

दरम्यान, हाच निर्णय कायम राहिल्यास बनकर-कदम यांच्याकडून सोसायटीत गटात चर्चेत असलेली नावे पाहता लढत कमालीची चुरशीची होणार, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT