नाशिक

चांदवडमध्ये २९ ऑक्टोबरपासून ‘रेणुका कृषि प्रदर्शन २०२६’

CD
चांदवडमध्ये उद्यापासून ‘रेणुका कृषी प्रदर्शन सकाळ वृत्तसेवा चांदवड, ता. २७ : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषीपूरक उद्योग, महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चांदवड येथे २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ‘रेणुका कृषि प्रदर्शन २०२६’ होणार आहे. प्रदर्शनात २०० हून अधिक स्टॉल असणार असून, शेतीपासून उद्योग-व्यवसायापर्यंत विविध विषयांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या प्रदर्शनाला शेतकरी आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यंदाही प्रदर्शनात यंत्रसामग्री, शेतीतील नवनवीन प्रयोग, पशुसंवर्धन, कृषी प्रक्रिया उद्योग, गृहपयोगी वस्तू, महिला बचत गटांचे स्टॉल आणि खाद्य जत्रा ही प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे असतील. प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या गुरूवारी (ता. २९) ऑक्टोबरला बीजमाता राहिबाई पोपरे यांचे ‘देशी बियाणे ते समृद्ध शेती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. देशी बियाण्यांचे संवर्धन आणि शाश्वत शेतीविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय द्राक्ष हंगाम व्यवस्थापन, कांदा व्यवस्थापन, डाळिंब लागवड, भाजीपाला उत्पादन आणि हवामानविषयक मार्गदर्शन होणार आहे. युवकांसाठी ‘रेणुका युवा संवाद’ युवकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे आणि शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहण्याची नवी दिशा मिळावी, या उद्देशाने गुरुवारी दुपारी तीनला ‘रेणुका युवा संवाद’ होणार आहे. विवेकानंद मारुती पाटील युवकांशी संवाद साधणार आहेत. ‘शेतकऱ्यांचा मुलगा, युवकांचा आवाज : भविष्याची दिशा कोण ठरवणार’ या विषयावर खुली चर्चा होणार आहे. ‘शेतकरी ते उद्योजक : समृद्धीचा नवा प्रवास’ यावर कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. मुकुंद गंगाधर शिंदे, उद्योग विचार मंचाचे अध्यक्ष रामेश्वर पवार मार्गदर्शन करणार आहेत. महिलांसाठी ‘होम मिनिस्टर : खेळ पैठणीचा’ ही स्पर्धा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT