OZM26B14836
ओझर ः रेणुकामातेची बैलगाडीतून काढण्यात आलेली मिरवणूक.
--------------
३०-२
‘डीजे’ टाळून परंपरा जपत
संबळच्या तालावर मिरवणूक
-----------
रेणुका मातेची बैलगाडीतून मिरवणूक
----------
ओझर, ता. १२ ः आधुनिकतेच्या झगमगाटात पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश देत येथील श्री संत सावता महाराज चौक, वरचा माळीवाडा मित्र मंडळाने नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी आई रेणुका मातेची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने उत्साहात काढली. डीजेचा दणदणाट आणि महागड्या बँजोला फाटा देत बैलगाडीतून तसेच संबळ या पारंपरिक वाद्याच्या निनादात काढलेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली.
मंडळ गेल्या जवळपास ३५ वर्षांच्यावाटचालीत मंडळाने अनेक पौराणिक, ऐतिहासिक आणि देशभक्तिपर विषयांवर आधारित हलते-बोलते देखावे सादर केले आहेत. या देखाव्यांच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक आणि देशभक्तिपर विचारांची मांडणी करत समाजापर्यंत विविध संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. आकर्षक सजावट केलेल्या बैलगाडीतून आई रेणुका मातेची मिरवणूक काढण्यात आली. आधुनिक ध्वनियंत्रणांऐवजी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेल्या संबळ वाद्याला प्राधान्य देण्यात आले.
बैलगाडीवरील आई रेणुका मातेचे मनमोहक स्वरूप, सजावटीसाठी वापरण्यात आलेली हिरवीगार केळीची पाने आणि संबळाच्या तालावर निघालेली मिरवणूक यांमुळे पारंपरिक उत्सवाचे दर्शन घडले. ‘डीजेच्या आवाजापेक्षा संबळाचा नाद मोठा होऊ द्या’ या विचाराला कृतीतून साथ देत मंडळाने पारंपरिक वाद्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.