Zilla Parishad nashik esakal
नाशिक

Nashik ZP News : ‘ZP’च्या शासकीय निवासस्थानी ‘स्वयंसेवी’च्या प्रतिनिधींचे वास्तव्य?

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने कुलूप बंद असलेली पदाधिका-यांच्या दालने स्वयंसेवी संस्थांच्या बैठकांसाठी खुली करण्यात आल्यानंतर आता स्वयंसेवी संस्थांच्या काही प्रतिनिधींना शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आल्याचे समोर आले आहे.

शहरातील कॉलेज रोडवर जिल्हा परिषद अधिकारींसाठी असलेल्या निवासस्थानी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी बेकायदेशीरपणे वास्तव करत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. (Representatives of NGOs living illegally in residence meant for Zilla Parishad officials nashik news)

दुसरीकडे बंद असलेल्या पदाधिका-यांच्या निवासस्थानी देखील तेथील कर्मचाऱ्याचे चार विद्यार्थी राहत असल्याची बाब चर्चिली जात आहे.

प्रशासक असल्याने तत्कालीन पदाधिका-यांची दालने उघडण्यात आलेली नाहीत. मात्र, स्वयंसेवी संस्थांच्या बैठकांसाठी ही दालने काही दिवसांपूर्वी खुली करण्यात आली होती. आता स्वयंसेवी संस्थांच्या काही प्रतिनिधींसाठी जिल्हा परिषदेंतंर्गत असलेली निवासस्थाने खुली करून देण्यात आल्याचे समजते. कॉलेज रोडवर शासकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आहे.

यात अनेक विभागप्रमुख राहत आहे. अधिकाऱ्यांसाठी असलेली ही निवासस्थानी जिल्हा परिषदेत काम करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे काही प्रतिनिधींना राहण्यासाठी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शासकीय निवासस्थानी बाहेरील व्यक्तींना प्रवेश नसतो हे निवासस्थान शासकीय अधिकारी, कर्मचा-यां व्यातिरिक्त कोणालाही देता येत नाही असा शासन आदेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, या निवासस्थानी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी बेकायदेशीरपणे राहत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत स्वयंसेवी संस्थांची चलती आहे. कोणत्याही विभागातील योजना असो ती संस्थेच्या माध्यमातून राबविण्याचा फतवा काढला जात असल्याची चर्चा आहे.

संबंधित संस्था प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या बैठका घेतल्या जात आहे. बैठकांपर्यंत ठिक होते, मात्र, त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील शासकीय निवासस्थानात केली जात असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पदाधिकारी निवासस्थानी चार मुले?

सारडा सर्कल परिसरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह सभापतींचे निवासस्थान आहे. प्रशासकीय राजवट असल्याने हे निवासस्थानही दीड वर्षांपासून बंद आहेत. केवळ साफसफाईसाठी खुली केली जातात. मात्र, येथे चार मुले राहत असल्याची चर्चा आहे. तेथील देखभाल करण्याकरिता स्वतंत्र बिगारी नियुक्त करण्यात आले आहे. ते असताना देखील येथे चार मुले कशी राहतात ? नेमके कोणाच्या आशीर्वादाने हे मुली येथे राहतात हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्चू? भारताच्या प्रशिक्षकांनी स्पष्टच उत्तर दिलं, 'त्याच्याबद्दलची चर्चा...'

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत सुताच्या गोडाऊनला भीषण आग

Leopard Found Dead in Satara : साताऱ्यात उसाच्या फडात काय होतं? पाचटीत सडलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह; बळी गेला की घातपात?

HSC Science paper leak : बारावी सायन्स फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा

Bagalkot Shivaji Jayanti Violence : बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक; तीन पोलिस जखमी, मुख्य आरोपी तंजीरसह आठ जण अटकेत

SCROLL FOR NEXT