A psychopath in female disguise caught on CCTV in front of a commercial complex in Indiranagar area. esakal
नाशिक

Nashik : स्त्री वेशात फिरणाऱ्या मनोविकृतामुळे रहिवासी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : सोयगाव व परिसरात स्त्री वेशात फिरणाऱ्या मनोविकृताच्या कारवायांनी या भागातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन वर्षापासून त्याची ही विकृती कायम आहे. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान या भागात फिरताना तो अनेकांना आढळून आला. काही दिवसांपूर्वी सीसीटीव्हीतही हा मनोविकृत कैद झाला आहे. मनोविकृताच्या कारवायांमुळे या भागात भीतीचे वातावरण आहे.

सोयगाव परिसरातील विठ्ठलनगर, जिभाऊनगर, इंदिरानगर, पारिजात कॉलनी, डि. के. चौक परिसरात महिलांचे कपडे घालून फिरणारा हा माणूस महिलांनाच त्रास देत आहे. अंधारात बसून या रस्त्याने फिरताना महिला दिसताच त्यांना पाठीमागून धरून घेत आहे. अचानक होणाऱ्या या प्रकारामुळे महिलांची भंबेरी उडते. (Residents troubled by psychopath roaming in indiranagar area in female disguise Nashik Latest Marathi News)

पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलादेखील यामुळे त्रस्त आहेत. मनोविकृताचा पेहरावही विचित्र आहे. महिलांचा गाऊन परिधान करून तोंडाला कापड बांधून फिरणारा हा विकृत सिनेमातील मेकअप केलेल्या भुतासारखा भासतो. गुरुवारी पहाटे चार ते पाऊणेचारच्या दरम्यान इंदिरानगर परिसरातील रुचिका जनरल स्टोअर्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा मनोरुग्ण कैद झाला.

परिसरात तो मोकाट फिरत आहे. त्याची माहिती अथवा ठावठिकाणा माहित नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुलांचाही त्याने विचित्र आवाज करत काहीवेळा पाठलाग केल्याची माहिती आहे. महिलांचे साडी, ब्लाउज, अंतर्वस्त्रे चोरण्याची त्याला सवय आहे. या मनोविकृताचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

"मनोविकृताचे चित्रीकरण पाहता या व्यक्तीची शारीरिक व मानसिक तपासणी करणे आवश्‍यक आहे. कुटुंबियांकडूनही पुर्व इतिहास व माहिती मिळाल्यास आजाराचे निदान करून औषधोपचार व समुपदेशन केल्यास परिस्थिती सुधारु शकेल. कुटुंबियांनी यासाठी पुढे यावे."

- डॉ. मनोज दसपुते, मानसोपचार तज्ज्ञ, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT