Bus Sakal
नाशिक

नाशिकमध्ये बससेवेला प्रवाशांचा अल्‍प प्रतिसाद

अरुण मलानी

निर्बंध शिथिल केल्‍यानंतर राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या नाशिक विभागातर्फे बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. जिल्‍हांतर्गत व जिल्‍हाबाहेरील बस प्रवाशांच्‍या सेवेत उपलब्‍ध केल्‍या होत्‍या.

नाशिक : निर्बंध शिथिल केल्‍यानंतर राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या नाशिक विभागातर्फे बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. जिल्‍हांतर्गत व जिल्‍हाबाहेरील बस प्रवाशांच्‍या सेवेत उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. सोमवारी (ता. ७) विभागातून २१६ बस सोडण्यात आल्‍या. सामान्‍य परिस्‍थिती रोज पाचेशहून अधिक बस नाशिकहून सोडल्‍या जात होत्‍या. त्‍यामुळे पहिल्‍या दिवशीतरी बससेवेला प्रवाशांचा अल्‍प प्रतिसाद मिळाला. (response for st bus in nashik after unlock was less)

कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळाच्‍या उत्‍पन्नावर पारी फेरले. गेल्‍या वर्षीपासून दीर्घ कालावधीसाठी बससेवा प्रभावित झाली आहे. दरम्‍यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍याने निर्बंध शिथिल करताना सार्वजनिक वाहतूक सेवेला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील जुने सीबीएस, नवीन सीबीएस, महामार्ग बसस्‍थानकांहून बस सोडण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवाशांची फारशी गर्दी बसस्‍थानकांवर बघायला मिळाली नाही.

नाशिक विभागातून अन्‍य जिल्‍ह्यांसाठी सायंकाळी उशीरापर्यंत २१६ बस सोडल्‍या होत्‍या. यात निमआराम आणि सामान्‍य बसचा समावेश होता. नवीन सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकातून पुणे, धुळे, औरंगाबाद, बोरीवली, दादर, नंदुरबार, शिर्डी, नगर आदी ठिकाणांसाठी बस सुटली. जिल्‍हांतर्गत सटाणा, मालेगाव, कळवण, सिन्नर, नांदगाव, येवला, पेठ, कसारा मार्गांवर बस धावली.

सिटी बस बंदच

महापालिकेची शहर बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. यापूर्वी एसटी महामंडळातर्फे सिटी बससेवा पुरविली जात होती. या पार्श्वभूमीवर जिल्‍हांतर्गत व लांब पल्ल्‍याच्‍या बसफेऱ्या सुरू करताना महामंडळाने अद्याप सिटीबस सुरू केल्‍या नसल्‍याचे सांगितले जात आहे. त्‍यामुळे सोमवारी सिटी बस धावल्‍या नाहीत.

(response for st bus in nashik after unlock was less)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT