importance of Helmet use experience
importance of Helmet use experience esakal
नाशिक

हेल्मेटमुळे प्राण वाचलेल्या तुषारची भावनिक प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

प्रतिक जोशी : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : शहरात ‘नो हेल्मेट- नो पेट्रोल’ ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे. विशेष म्हणजे स्वतः नागरिक आणि पंपचालकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला हेल्मेट घालून आलेला व्यक्ती पेट्रोल भरून झाल्यावर विना हेल्मेट प्रवास करताना दिसतो. थोडक्यात हे महाभाग फक्त पेट्रोल मिळविण्यापुरते डोक्यात हेल्मेट घालतात, नंतर एकतर हेल्मेट घरी ठेऊन येतात किंवा ज्याचे उधार मागितले होते त्याचे त्याला परत करून आपल्या प्रवासाला निघतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ते निसरडे होताहेत. यामुळे अनेकदा दुचाकीस्वार घसरून पडतात. त्यात काहीवेळा किरकोळ दुखापत होते, तर काहीवेळा गंभीर दुखापतीमुळे जिवावरही बेतते. मात्र, आपण अशावेळेस हेल्मेट घातले असेल, तर किमान डोके सुरक्षित राहून आपण एका मोठ्या दुर्घटनेतून वाचू शकतो. आणि अशा दुर्घटनांतून अनेकवेळा प्राण वाचल्याची शहरात उदाहरणे आहेत.

२१ सप्टेंबर २०१७ घटस्थापनेचा दिवस. मालेगाव स्टँड, पंचवटी परिसरातील तरुण तुषार मोरे घटस्थापनेनिमित्त नातेवाइकांकडे जायला तपोवन येथे आपल्या मोपेड (स्कुटर)वर निघाला. वाटेत केवडीबनाजवळ गाडीसमोर कुत्रा आल्याने तुषारने अचानक गाडीचा ब्रेक दाबला. पावसाचे दिवस आणि त्यात मोपेड गाडी. ब्रेक दाबताच गाडी स्लिप झाली. गाडी वेगात असल्याने स्लिप होऊन गाडीसह तो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात आडवा पडला. घटनास्थळी स्थानिक लोकांनी धाव घेत तुषारला गाडीसह खड्ड्यातून बाहेर काढले. या अपघातात तुषारची शुद्ध हरपली होती. त्याने घातलेल्या हेल्मेटचेही दोन भाग झाले होते, पण हेल्मेटच्या आतील फोममुळे डोक्याला गंभीर इजा झाली नाही. गाडीचा अक्षरशः भुगा झाला होता. नंतर ती गाडी त्याने भंगारात विकली. प्राथमिक उपचारांनंतर हाता-पायाला फ्रॅक्चर लावले, पण त्या दिवशी केवळ डोक्यात हेल्मेट होते, म्हणून आज तुमच्याशी बोलतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया तुषारने ‘सकाळ’शी बोलताना दिली.

''मुळात लोकांना हेल्मेट घाला, हे सांगायलाच लागू नये. कारण हेल्मेट किती फायदेशीर आहे, हे घेतलेल्या अनुभवातूनच कळते. कधी कुणावर काय वेळ येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहे. मी शहरात सुरू असलेल्या ‘नो हेल्मेट- नो पेट्रोल’ या मोहिमेचे स्वागत आणि समर्थन करतो. आणि सर्वांनी हेल्मेट वापरावे, असे आवाहन करतो.''
- तुषार मोरे, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

IPL 2024: जड्डूनं 'तो' विजयी चौकार पुन्हा ठोकला अन् चेन्नईकरांच्या गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या

Voter Cards Video : जालन्यात शेकडो वोटर कार्ड कचऱ्यात फेकले; तपास सुरु, व्हिडीओ व्हायरल

Life Line: 'लाईफ लाईन' चित्रपटाची घोषणा; अशोक सराफ, हेमांगी कवीसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Naach Ga Ghuma: कौटुंबिक विनोदी चित्रपट; नात्याची गंमतीशीर गोष्ट मांडणारा ‘नाच गं घुमा’

SCROLL FOR NEXT