nashik mall esakal
नाशिक

निर्बंध कायम राहून दुकानांप्रमाणे मॉलला परवानगी?

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग (coronavirus) दर ४.३९ टक्के असला, तरी उसळणाऱ्या बेसुमार गर्दीमुळे आणखी आठवडाभर तरी निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाही. मात्र त्याच वेळी दुपारी चारपर्यंत दुकानाप्रमाणे मॉलला परवानगी देण्याचा प्रशासन विचार करीत आहे. (Restrictions-remain-malls-opening-permission-nashik-marathi-news)

दुकानाप्रमाणे मॉलला परवानगी?

मिशन अनलॉकअंतर्गत जिल्ह्यात सोमवार (ता. २१)पासून मॉल्स सुरू करण्याला परवानगी देण्याचा प्रशासन विचार करीत आहे.दरम्यान, शनिवारी (ता. १९) पालकमंत्री छगन भुजबळ कोरोनाचा आढावा घेऊन निर्णय घेतील. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण अनलॉकची काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारच्या मिशन अनलॉकमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असून, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आलेखात दिवसेंदिवस घसरण होत आहे. त्यामुळे सोमवारपासून निर्बंधांमध्ये आणखी सवलत मिळण्याची आशा आहे. मात्र रुग्णसंख्येत घट होत असली तरी रुग्ण पॉझिटिव्हिटी दरात फारसा फरक पडलेला दिसून येत नाही.

वीकेंड लॉकडाउन कायम

नाशिक शहरात रुग्णसंख्येचा दर अडीच टक्के असताना ग्रामीणमध्ये हाच दर ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. परिणामी तूर्तास दुकाने व आस्थापनांसाठी घालून दिलेली दुपारी चारपर्यंतची वेळेची मर्यादा कायम ठेवताना वीकेंड लॉकडाउन ‘जैसे थे’ सुरू राहणार आहे. जिल्ह्याच्या निर्बंधात कोणतेही बदल अपेक्षित नसले तरी सोमवारपासून मॉल्स सुरू करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. इतर दुकाने व आस्थापनांप्रमाणे मॉल्सलादेखील दुपारी चारपर्यंत वेळेचे बंधन असेल, असे वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे.

गर्दी कायम

दुपारी चारपर्यंत सर्व बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, तरीही बाजारपेठांमधील गर्दी काही कमी होत नाही. ही गर्दी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी निमंत्रण देणारी न ठरो या भावनेतून प्रशासन निर्बंध शिथिल करताना पूर्ण अनलॉकचा विचार करीत नसल्याचे समजते. पालकमंत्री छगन भुजबळ शनिवारी (ता. १९) कोरोना आढावा बैठक घेणार आहे. या आढावा बैठकीनंतरच अनलॉक निर्बंधातील सवलतींबाबत अंतिम निर्णय होईल. त्यामुळे जिल्हावासीयांच्या नजरा या आढावा बैठकीकडे लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

SCROLL FOR NEXT