नाशिक

धुळे आत्मदहन प्रयत्न

CD
धुळे ः टुडे १ साठी --- फोटो क्रमांक ः 34919 धुळे ः थकीत आर्थिक लाभासाठी महापालिका आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेताना पीडित निवृत्त कर्मचारी. --- निवृत्त कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न महापालिका आवारात खळबळ; थकीत देयकांसाठी उचलले पाऊल सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः निवृत्त होऊन आठ वर्षे उलटूनही थकीत पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि अन्य आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे संतापलेल्या महापालिकेच्या येथील तीन निवृत्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) महापालिका आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि दिरंगाईमुळे हतबल झालेल्या कर्मचाऱ्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावसामुळे मनपा वर्तूळात खळबळ उडाली आहे. भानुदास शिवराम बगदे, मुकुंद रामदास शिंदे आणि सुरेश आत्माराम पाटील, अशी या तीन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या तिघांचे लाखो रुपयांचे आर्थिक लाभ मनपाकडे प्रलंबित आहेत. यासंदर्भात त्यांनी सांगितले, की याआधी जुलैमध्ये आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनपाच्या आस्थापना विभागाने १५ जुलैला लेखी पत्र देत प्राप्त होणाऱ्या निधीतून देयके अदा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच उपायुक्त सोनाली देवरे यांनीही महिनाभरात पैसे देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, चार महिने उलटूनही प्रत्यक्षात एकही रुपया मिळाला नाही. भानुदास बगदे यांच्या मुलीचे येत्या २५ नोव्हेंबरला लग्न ठरले आहे, तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीचेही लग्न ठरले आहे. विवाहादी खर्चासाठी आणि हक्काचे पैसे मिळत नसल्याने हे कर्मचारी हतबल झाले होते. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने या तिघांनी २७ ऑक्टोबरला प्रशासनाला पत्र देऊन पंधरा दिवसांत देयके न मिळाल्यास १२ नोव्हेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने या पत्राची कोणतीही दखल घेतली नाही किंवा साधे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. गुरुवारी ठरल्याप्रमाणे हे कर्मचारी मनपा आवारात पोहोचले आणि भानुदास बगदे यांनी स्वतःवर पेट्रोल ओतले. प्रशासनाला आधीच पूर्वकल्पना व निवेदनाची प्रत दिलेली असतानाही पोलिस अर्धा तास उशिराने घटनास्थळी पोहोचले, तर या संपूर्ण प्रकारादरम्यान महापालिकेचे एकही जबाबदार अधिकारी जागेवर उपस्थित नव्हते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. प्रशासनाच्या निर्ढावलेल्या भूमिकेमुळेच आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे पीडित कर्मचारी बगदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

IRCTC Shimla-Manali Winter Special Tour Package : नोव्हेंबरच्या अखेरीस शिमला-मनाली फिरण्याची सुवर्णसंधी; IRCTC कडून 'विंटर स्पेशल टूर पॅकेज' जाहीर, टॉय ट्रेनचा प्रवास ते विमानाची सुविधा एकाच पॅकेजमध्ये

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Latest Marathi News Live Update : 'एनविआडिया'चे सीईओ जेन्सन ह्युयांग यांचा अखेर राजीनामा

SCROLL FOR NEXT