JLC26B12914
जळगाव : प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करताना एसटीचे निवृत्त कर्मचारी.
---
एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन
थकीत वेतनवाढ, भत्ते आणि पेन्शनसाठी जळगावात धरणे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : आयुष्यभर एसटी महामंडळाची सेवा करूनही निवृत्तीनंतर आपल्या हक्काच्या आर्थिक लाभांसाठी संघर्ष करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. प्रलंबित आर्थिक देणी, पेन्शन आणि विविध सुविधांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या जळगाव विभागातर्फे मंगळवारी (ता. ३) जळगाव येथे दिवसभर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या करारानुसार मिळणारी वाढीव वेतनवाढ तसेच २०१६ ते २०२० या कालावधीतील वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्याची थकबाकी एकरकमी अदा करण्याची मागणी करण्यात आली. २०२० ते २०२४ या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी आणि सेवा उपदानाचा फरक मिळाला असला, तरी रजेच्या फरकाची रक्कम अद्याप प्रलंबित आहे. ती तातडीने द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित कोविड भत्ता आणि रजा रोखीकरणाची थकीत रक्कमही त्वरित अदा करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले. निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महामंडळाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
चौकट
मोफत प्रवासाचा मुद्दा
निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या ई-व्ही बससह सर्व प्रकारच्या बसमधून वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा द्यावी. तसेच किमान ७ हजार ५०० रुपये अधिक महागाई भत्ता इतके मासिक पेन्शन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. सप्टेंबर २०२५ पासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेले पेन्शन तातडीने सुरू करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.