नाशिक

एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ३ नोव्हेंबरला धरणे आंदोलन

CD
एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ३ नोव्हेंबरला धरणे आंदोलन दिवाळीपूर्वी थकबाकी द्या; शासनाकडे मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी दिवाळीपूर्वी अदा करावीत, याबाबत ३ नोव्हेंबर रोजी आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार अशी माहिती राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव सुरेश चांगरे यांनी दिली. धरणे आंदोलनाबाबत मंगळवारी एसटीच्या निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुरेश चांगरे, केंद्रीय सदस्य गुलाब शेख यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अभय सहजे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव विभागात सुमारे १५ हजार निवृत्त कर्मचारी असून, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम, वेतनवाढीतील फरक, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच अन्य आर्थिक देणी अद्याप प्रलंबित असल्याचे संघटनेने सांगितले. करार कालावधीतील थकबाकी एकरकमी द्यावी, तसेच २०२० ते २०२४ या काळातील भविष्य निर्वाह निधी व उपदानातील फरकाची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच एसटीच्या ई-बससह सर्व प्रकारच्या बसमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास द्यावा, किमान ७,५०० रुपये अधिक महागाई भत्ता इतके पेन्शन मिळावे, तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेले पेन्शन सुरू करावे आणि कोविड काळातील भत्ता तसेच रजा रोखीकरणाची रक्कम द्यावी, अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत. चौकट जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन आंदोलन नवीन बसस्थानक येथील विभागीय कार्यालयासमोर ३ नोव्हेंबरला दुपारी बाराला केले जाणार आहे. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देखील दिले जाणार असल्याची माहिती चांगरे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BP Singh Passes Away: CIDचे निर्माते-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, प्रेक्षकांचे लाडके बी. पी. सिंह यांचं निधन; मनोरंजन विश्वात शोककळा

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक; महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर

Satana News : आदिवासी गावांच्या पाणीप्रश्नावर ‘एसएनएफ’ची धडपड; हास्यजत्रेच्या मदतीने जलप्रकल्पांना बळ

Water Scarcity: ३६ तासांची पाणीकपात ५५ तासांवर, उल्हासनगर पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका

SCROLL FOR NEXT